एकत्र जन्मले… एकत्र जगले आणि आता मृत्यूही सोबतच, 24 वर्षीय जुळ्या भावांचा कोरोनाने मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मेरठ: कोरोना (Corona) हा आता ‘काळ’ बनून समोर आला आहे. कोरोना दिवसेंदिवस हा अधिक धोकादायक होत चालला आहे. आता एक अशी बातमी समोर आली आहे की, ज्यामुळे आपलं देखील हृदय पिळवटून निघेल. उत्तर प्रदेशच्या दोन जुळ्या भावांचं (Twin brothers) कोरोनाने एकाच वेळी निधन (died) झाल्याचं धक्कादायक वृत्त आता समोर आलं आहे.

ADVERTISEMENT

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, ग्रेगरी रेमंड राफेल हे मेरठच्या कँट परिसरात राहतात. ते पेशाने शिक्षक आहेत. त्यांना तीन मुलं होती. ज्यापैकी दोघं हे जुळे होते. एकाचं नाव होतं जोफ्रेड ग्रेगरी आणि दुसऱ्याचं नाव होतं राल्फ्रेड ग्रेगरी. दोघांचा जन्म 23 एप्रिल 1997 साली झाला होता. या दोघांच्या जन्मामध्ये फक्त 3 मिनिटांचा होता. दोघांचा जन्म एकाच वेळी झाल्याने शिक्षणापासून सगळ्या गोष्टीच एकत्र करत होते. दोघेही नुकतेच कॉम्प्युटर इंजिनिअर झाले होते. त्यामुळे नोकरीला देखील दोघं एकत्रच लागले. त्यांच्यातील मोठा मुलगा हा हैदराबादमध्ये काम करत होता तर छोटा मुलगा हा गुरुग्राममधील एका कंपनीत काम करत होता. पण सध्या हे दोघेही वर्क फ्रॉम होम करत होते.

कोरोना नाही पण भुकेमुळे नक्कीच जीव जाईल ! विडी कामगार महिलांना लॉकडाउनचा फटका

हे वाचलं का?

दोघांनी नुकताच सेलिब्रेट केला होता 24वा वाढदिवस

मागील महिन्यातील 23 एप्रिलला दोघा भावांनी आपला 24वा वाढदिवस सेलिब्रेट केला होता. पण त्याच्या दुसऱ्याच दिवशी दोघांनाही कोरोनानं गाठलं. त्यानंतर उपचारादरम्यान 13-14 मे रोजी दोन्ही भावांनी काही तासांच्या अंतराने दोघाही भावांचं निधन झालं.

ADVERTISEMENT

रेमंड राफेल यांनी सांगितलं की, जोफ्रेड आणि राल्फ्रेड या दोघांनाही 24 एप्रिलला ताप आला होता. घरात सर्व लोक कोरोना पॉझिटिव्ह होते. सुरुवातीला जोफ्रेड आणि राल्फ्रेड यांच्यावर घरीच उपचार सुरु होते. आम्ही एक ऑक्सिमीटर खरेदी केलं होतं. जेव्हा त्यांची ऑक्सिजन पातळी 90 टक्क्यांच्या खाली गेली तेव्हा डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की, दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यास सांगितलं. त्यानंतर 1 मे रोजी त्यांना आम्ही एका खासगी रुग्णालयात दाखल केलं.’

ADVERTISEMENT

Ground Report: कोरोना शहरातून गावाकडे, कोरोनाचा आता ग्रामीण भागात धुमाकूळ

या दोन्ही मुलांचा पहिला रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला होता. पण काही दिवसानंतर जेव्हा दुसऱ्यांदा त्यांची चाचणी करण्यात आली तेव्हा त्यांचा दुसरा रिपोर्ट हा निगेटिव्ह आला होता. याबाबत रेमंड यांनी बोलताना सांगितलं की, ‘डॉक्टरांनी दोघांना कोव्हिड वॉर्डमधून दुसऱ्या नॉर्मल आयसीयू वॉर्डमध्ये हलविण्याची तयारी करत होते. पण मी हॉस्पिटलमधील स्टाफला विनंती केली की, त्यांना पुढचे दोन दिवस त्याच वॉर्डमध्ये ठेऊन त्यांना मॉनिटर करण्यात यावं. पण अचानक 13 मे रोजी अचानक माझ्या पत्नीच्या फोनवर हॉस्पिटलमधून फोन आला आणि आमच्यावर दु:खाचा डोंगरच कोसळला.’

वडील राफेल यांनी सांगितलं की, सुरुवातीला दोन्ही मुलांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर 2 दिवसांनी म्हणजे 13 मे रोजी मोठ्या मुलाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि रात्री 12 वाजेच्या सुमारास त्याचं निधन झालं. त्यानंतर 13 तारखेला रात्री उशिरा दुसऱ्या मुलाची देखील प्रकृती बिघडू लागली. त्याचं देखील 14 मे रोजी निधन झालं.

कोरोना रुग्णावर कोणत्या परिस्थिती कोणते उपाय करावे?, या आहेत नव्या गाइडलाइन्स

राफेल यांनी सांगितलं की, ‘जेव्हा जोफ्रेडच्या मृत्यूची बातमी माझ्या पत्नीला समजली तेव्हा तिच्या तोंडून हेच शब्द निघाले की, आता माझा राल्फ्रेड देखील वाचणार नाही. झालंही तेच… काही तासातच राल्फ्रेड याच्या मृत्यूची देखील बातमी आमच्यावर येऊन आदळली. आम्हाला आमच्या दोन्ही मुलांना चांगलं आयुष्य द्यायचं होतं. आम्ही आतापर्यंत मुलांचं अगदी योग्यरित्या पालन-पोषण केलं होतं. दोन्ही मुलांनी नोकरीनिमित्त कोरिया आणि जर्मनीला जाण्याचा प्लान केला होता.’

खरं तर राफेल यांच्या दोन्ही मुलांना एकाच वेळी हिरावून काळानं देखील त्यांच्यावर अन्याय केलाए. कोरोनाच्या काळात अनेकांना आपल्या प्रियजनांना गमवावं लागत आहे. त्यामुळेच या कठीण परिस्थितीत प्रत्येकाने आपली काळजी घेणं हे फार गरजेचं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT