”तुला फक्त मलायकाचा बॉयफ्रेंड म्हणून ओळखतात”; युजर्सने अर्जुनला कपूरलाच केलं ट्रोल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बॉलिवूड चित्रपटांना बॉयकॉट करण्याचा सध्या ट्रेंड सुरु आहे. बड्या स्टार्सचे सिनेमे देखील बॉक्स ऑफिसवर आपटताना दिसत आहेत. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच सोशल मीडियावर लोक बॉयकॉटचा ट्रेंड चालवत आहेत. अशा परिस्थितीत बॉलिवूड स्टार्स आणि चित्रपटाशी संबंधित लोकांच्या अडचणी वाढत आहेत. आता अर्जुन कपूरने बॉयकॉटच्या ट्रेंडवर मौन सोडले आहे, परंतु नंतर तो स्वत: ट्रोल झाला आहे.

ADVERTISEMENT

बॉयकॉट ट्रेंडवर अर्जुन कपूर काय म्हणाला?

अर्जुन कपूरने बॉलीवूडच्या सध्या सुरु असलेल्या बॉयकॉट ट्रेंडवरती नाराजी व्यक्त केली आहे. बॉलीवूड हंगामाशी नुकत्याच झालेल्या संभाषणात अर्जुनने बॉयकॉट बॉलीवूड ट्रेंडचा जोरदार निषेध केला. यावर मौन धारण करून इंडस्ट्रीतील लोकांनी चूक केली आहे, असे तो म्हणाले. पुढे अर्जुन म्हणाला की ही आमची शालीनता होती, पण लोकांनी त्याचा चुकीचा फायदा घेतला आहे. मला असं वाटतं आमचं काम कसं यावरुन आमची कामगिरी ठरवली पाहिजे असे अर्जून म्हणाला.

हे वाचलं का?

”तुम्हाला प्रत्येक वेळी हात घाण करण्याची गरज नाही. पण मला वाटतं आता आपण खूप सहन केलं आहे आणि लोकांनी त्याची सवय करून घेतली आहे. आपण एकत्र येऊन याबद्दल काहीतरी केले पाहिजे कारण जे लोक आपल्याबद्दल लिहितात आणि हॅशटॅग ट्रेंड होत आहेत त्यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.” असेही अर्जून कपूर म्हणाला. पुढे बोलताना अर्जुन कपूर म्हणाला ”जेव्हा आपण एखादा चित्रपट करतो आणि तो बॉक्स ऑफिसवर चांगला चालतो, तेव्हा लोक आपल्याला आपल्या आडनावामुळे नाही तर आपल्या कामामुळे ओळखतात. आता आणखी काही घडू लागले आहे… हे अन्यायकारक आहे.”

ADVERTISEMENT

अर्जुन कपूरवरती लोक संतापले

अर्जुनच्या या वक्तव्यावर लोकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर लोक अर्जुनला सत्य सांगत आहेत. अर्जुनला ट्रोल करताना एका यूजरने त्याच्या आतापर्यंतचे सर्व फ्लॉप चित्रपटांची यादी सांगितली. वापरकर्त्याने लिहिले – नेपो किड अर्जुन कपूरच्या करिअरमध्ये हिटपेक्षा जास्त फ्लॉप चित्रपट आहेत आणि तो बॉलिवूडमधील एक असल्याबद्दल बोलत आहे. अर्जुन कपूर जर नेपो किड नसता तर त्याला इतके चित्रपट मिळाले नसते.

ADVERTISEMENT

अर्जुनला ट्रोल करताना एका यूजरने त्याला फक्त मलायका अरोराचा बॉयफ्रेंड म्हटले आहे. युजरने लिहिले ”तुझ्या चित्रपटांपेक्षा मलायका अरोराच्या बॉयफ्रेंडच्या नावानेच तुला जास्त ओळखले जाते. लोकांना धमकावण्याचा प्रयत्न करू नको. अर्जुन डिझास्टर फिल्म बनवत राहील असेही युजरने लिहिले आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT