10 लाखांचं बक्षीस असलेल्या तीन जहाल नक्षलवाद्यांना अटक; गडचिरोली पोलीस दलाची कारवाई 

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

व्यंकटेश गाड

ADVERTISEMENT

गडचिरोली- आज सकाळी उपविभाग भामरागड अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र लाहेरी हद्दीतील कोयार जंगल परिसरात विशेष अभियान पथक (सी-60) आणि सीआरपीएफ बटालियन 37 च्या जवानांनी नक्षलवाद्यांना विरोधात राबविलेल्या संयुक्त अभियानात दोन जहाल नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे.

सोबतच हेडरी उपविभाग अंतर्गत पोलीस मदत केंद्र गट्टा हद्दीतील झारेवाडा जंगल परिसरात नक्षलविरोधी विशेष अभियान पथकाच्या जवानांनी एका जहाल नक्षलवाद्याला अटक केली. रमेश पल्लो (29), रा. कोयार ता. भामरागड, तानी उर्फ शशी चमरू पुंगाटी (23) रा. पद्दूर ता. भामरागड आणि अर्जून उर्फ महेश नरोटे (27) रा. झारेवाडा ता. एटापल्ली अशी अटक केलेल्या नक्षलवाद्यांची नावे आहेत.

हे वाचलं का?

गोपनीय माहितीच्या आधारे ‘अशा’ आवळल्या मुसक्या

मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, आज सकाळी भामरागड तालुक्यात विशेष अभियान पथक (सी-60) व सीआरपीएफ बटालियन 37 चे जवान लाहेरी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत येणाऱ्या कोयार जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवित असताना संशयास्पद स्थितीत फिरताना दोन इसम पोलीसांना आढळून आले. चौकशी केली असता ते नक्षली असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली. दुसरीकडे एटापल्ली तालुक्यातील गट्टा पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील झारेवाडा जंगल परिसरात विशेष अभियान पथकाने एका नक्षलीस अटक केली. त्यापैकी रमेश कल्लो हा 2019 मध्ये नक्षल चळवळीत भरती होउन कंपनी 10 च्या ऍक्शन टीममेंबर व स्काउट टिममेंबर म्हणून कार्यरत होता.

त्याच्यावर खून, चकमचक, जाळपोळ प्रकरणी एकूण 13 गुन्हे दाखल होते. त्याच्यावर शासनाने 4 लाखाचे बक्षीस ठेवले होते. तर तानी उर्फ शशी चमरू पुंगाटी ही महिला नक्षल असून 2015 मध्ये नक्षल चळवळीत भरती झाली. सन 2016 ते 19 पर्यंत प्लाटून पदावर कार्यरत होती. 2019 नंतर कंपनी 10 मध्ये नक्षली सदस्य पदावर कार्यरत होती. तिच्यावर खून, चकमक, जाळपोळ प्रकरणात एकूण 7 गुन्हे दाखल होते. तिच्यावर 4 लाखाचे बक्षीस होते. तर गट्टा परिसरातून अटक केलेल्या अर्जून उर्फ महेश नरोटे हा 2010 ते 13 पर्यंत पेरमिली दलम मध्ये कार्यरत होता.

ADVERTISEMENT

त्यानंतर तो प्लाटून क्र. 14 मध्ये कार्यरत होता. त्यानंतर तो सिरोंचा दलम मध्ये 2018 पर्यंत तर 2018 पासून तो भामरागड दलम मध्ये कार्यरत होता. त्याच्यावर खून, चकमक, जाळपोळ, दरोडा व चोरी प्रकरणात एकूण 24 गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्यावर 2 लाखाचे बक्षीस होते. सन 2021-22 दरम्यान गडचिरोली पोलिसांनी राबविलेल्या विशेष अभियानात एकूण 57 जहाल नक्षलवाद्यांना अटक करण्यात यश आले आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT