संतापजनक घटना… एकाच रुग्णवाहिकेत कोंबले 22 कोरोना रुग्णांचे मृतदेह

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

रोहिदास हातागळे

ADVERTISEMENT

बीड: मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते… असं बऱ्याचदा म्हटलं जातं पण आज कोरोनाच्या संकट काळात मरणानंतर देखील कोरोना बाधितांची काही सुटका होत नसल्याचं धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे. तशाच स्वरुपाची एक अशी घटना आता समोर आली आहे. ज्यामुळे आपणही गलबलून जाल. बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात कोरोनामुळे मृत झालेल्या तब्बल 22 रुग्णांचे मृतदेह एकाच रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीकडे नेण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

या प्रकारामुळे मरण पावल्यानंतरही कोरोना बाधितांची अवहेलना काही थांबत नसल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकारामुळे स्वाराती रुग्णालय प्रशासनाविरोधात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

हे वाचलं का?

बीड जिल्ह्यात कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातच अंबाजोगाई तालुक्यातील परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयावर प्रचंड ताण आहे. अशातच शेजारच्या सर्व तालुक्यातून देखील रुग्ण स्वाराती रुग्णालय इतर कोव्हिड सेंटरमध्ये दाखल होत आहेत. दुसरीकडे कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येसोबतच मृतांचेही प्रमाण प्रचंड वेगाने वाढत आहे.

महाराष्ट्रातला Lockdown वाढणार का? जाणून घ्या उत्तर

ADVERTISEMENT

कोरोनाची लागण झाल्याने अनेक रुग्णांना बेडपासून औषधांपर्यत सगळ्याच गोष्टीची मृत्यूनंतरही कोरोना रुग्णांच्या मृतदेहांची अवहेलना होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रविवारी (25 एप्रिल) दुपारी तब्बल 22 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे मृतदेह हे एकाच रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीकडे नेण्यात आले. हे सर्व मृतदेह यावेळी रुग्णवाहिकेत अक्षरशः कोंबले होते. मयत झालेल्या रुग्णांना अशा पद्धतीने अंत्यविधीसाठी नेण्याचा हा प्रकार अत्यंत धक्कादायक असून प्रशासनाविरोधात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान, याबाबत जेव्हा ‘मुंबई तक’ने विचारणा केली तेव्हा असं सांगण्यात आलं की, वाढीव रुग्णवाहिकांची मागणी कोरोनाच्या पहिल्या लाटेत करण्याती आली होती. आता सध्या आमच्याकडे दोन रुग्ण वाहिका आहेत आणि पाच रुग्णवाहिकांची मागणी आम्ही केलेली आहे. त्यासाठी आम्ही 17 मार्च रोजी जिल्हा प्रशासनाला पत्र दिले आहे. परंतु अद्याप रूग्णवाहिका मिळालेल्या नाहीत. रूग्णवाहिकेच्या कमतरतेमुळे आपत्कालीन स्थितीत रूग्णांची ने-आण करण्यासाठी या रूग्णवाहिकांचा वापर करण्यात येतो. अशी प्रतिक्रिया स्वाराती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी दिली आहे.

याबाबत उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांना विचारणा केली असता त्यांनी असं म्हटलं आहे की, ‘खरं तर कोरोना मृतांवर तात्काळ अंत्यसंस्कार करण्यात आले पाहिजे. यापुढे कोरोना पीडित मृतांवर तातडीने अंत्यसंस्कार केले जावेत. तशा स्वरुपाचे आदेशही देण्यात आले आहेत. दिवसभरातील मृतदेह जमा करून एकाच वेळी अंत्यसंस्कार करू नयेत अशा सक्त सूचना देखील देण्यात आल्याचे उपजिल्हाधिकारी झाडके यांनी सांगितलं आहे.

Double Mask: आता वेळ आली डबल मास्क घालण्याची, ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा; नाहीतर…

दरम्यान, याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी नगरपालिकेचे मुख्याधिकारी अशोक सांबळे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो अद्याप तरी होऊ शकलेला नाही.

मात्र या संपूर्ण प्रकारामुळे फक्त बीडमध्येच नव्हे तर अवघ्या राज्यात आता संताप व्यक्त करण्यात येत आहे. अशावेळी बीडमधील लोकप्रतिनिधी आता आरोग्य व्यवस्थेकडे नेमकं कधी लक्ष देणार? असा सवालही आता विचारला जात आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT