चंद्रपूर: बिअरसाठी पैसे दिले नाही, दोन मित्रांनी आपल्याच मित्राच्या पोटात खुपसली बिअर बॉटल
चंद्रपुरातील बल्लारपूर शहरात बिअरसाठी पैसे दिले नाहीत म्हणून दोन मित्रांनी नशेत आपल्याच मित्राच्या पोटात बिअरची बॉटल खुपसल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणात दोन्ही मित्रांना अटक केली आहे. बल्लारपूर शहरातील बिरसा मुंडा चौकात ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तीन मित्र हे बिअर पीत बसले होते. यापैकी नीरज यादव आणि अंकित रामटेके या दोन […]
ADVERTISEMENT
चंद्रपुरातील बल्लारपूर शहरात बिअरसाठी पैसे दिले नाहीत म्हणून दोन मित्रांनी नशेत आपल्याच मित्राच्या पोटात बिअरची बॉटल खुपसल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणात दोन्ही मित्रांना अटक केली आहे.
ADVERTISEMENT
बल्लारपूर शहरातील बिरसा मुंडा चौकात ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तीन मित्र हे बिअर पीत बसले होते. यापैकी नीरज यादव आणि अंकित रामटेके या दोन मित्रांनी तिसरा मित्र शाहरुख पठाणकडे आणखी बिअर विकत घेण्यासाठी पैसे मागितले.
कॉपरच्या तारेने पतंग उडवणं पडलं महागात, विजेचा धक्का लागून लहान मुलगा गंभीर जखमी
हे वाचलं का?
शाहरुखने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर दोघांनीही नशेच्या भरात बिअरची बॉटल फोडून शाहरुखच्या पोटात खुपसली. गंभीर जखमी झालेल्या शाहरुखवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बल्लारपूर पोलिसांनी या प्रकरणात दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT