पुण्यात मैत्रिणीला गिफ्ट देण्यासाठी ज्वेलर्समध्ये चोरी, मेडिकलच्या दोन विद्यार्थ्यांना अटक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे शहरातील हडपसर आणि कोथरूडमधील ज्वेलर्सच्या दुकानातील सोन्याच्या अंगठ्यांची चोरी करणाऱ्या मेडिकलच्या दोन आरोपींना जेरबंद करण्यात हडपसर पोलिसांना यश आलं आहे. यातील दोघे आरोपी हे वैद्यकीय शाखेचे शिक्षण घेत असून या मैत्रिणीला गिफ्ट देण्यासाठी ही चोरी केल्याची माहिती समोर आली आहे.

ADVERTISEMENT

सहाय्यक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील हडपसर येथील एका ज्वेलर्सच्या दुकानात 8 तारखेला दुपारच्या अनिकेत हणमंत रोकडे (वय-23, मूळचा लातूर ) वैभव संजय जगताप (वय 22-मूळचा वाशीम) या दोघांनी चोरी केली. हे दोघे बीएएमएस आणि बीएससी नर्सिंग शाखेच्या तिसर्‍या वर्षात शिक्षण घेत आहेत.

हे वाचलं का?

हे दोघेही व्यसनाधीन आहेत. या दोघांना त्यांच्या मैत्रिणीला गिफ्ट द्यायचे होते. पण जवळ पैसे नसल्याने या दोघांनी चोरी केली. त्यांचं आधी ठरल्यानुसार या दोघांनी हडपसर आणि कोथरूड येथील ज्वेलर्समध्ये चोरी करण्याचे ठरवले. त्या दोघांपैकी एक जण आतमध्ये जायचा आणि दुसरा बाहेर असलेला साथीदार दुचाकी चालू करून ठेवयाचा, आतमधील आरोपी अंगठी खरेदी करायची आहे. त्या करिता ट्रे मधील काही अंगठ्या पाहण्यास घ्यायचा समोरील व्यक्तीची नजर चुकून तेथून पळ काढत होते. या दोन्ही चोरीच्या घटनांमध्ये आरोपींनी चार अंगठ्या अंदाजे 36 ग्रॅम 700 वजनाच्या अंगठ्या चोरल्या आहेत. सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींना पकडण्यात यश आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT