Jalgaon: एकाच गावातील दोघांचा वीज कोसळून मृत्यू
मनीष जोग जळगाव: शेतातून घरी परतत असताना अंगावर वीज पडून (lightning) दोन जणांचा मृत्यू (Two persons died) झाल्याची धक्कादायक घटना जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात घडली आहे. गेल्या दोन दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात वीजांच्या कडकडाटासह जोरदार पर्जन्यवृष्टी देखील सुरु आहे. अशातच आज वीज कोसळून दोन जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आता समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगावमधील […]
ADVERTISEMENT
मनीष जोग
ADVERTISEMENT
जळगाव: शेतातून घरी परतत असताना अंगावर वीज पडून (lightning) दोन जणांचा मृत्यू (Two persons died) झाल्याची धक्कादायक घटना जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात घडली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात वीजांच्या कडकडाटासह जोरदार पर्जन्यवृष्टी देखील सुरु आहे. अशातच आज वीज कोसळून दोन जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आता समोर आलं आहे.
हे वाचलं का?
मिळालेल्या माहितीनुसार, जळगावमधील तळई गावात आज (9 जून) दुपारी तीन वाजेच्या सुमारास दोन वेगवेगळ्या ठिकाणी अचानक वीज कोसळली. ज्यामध्ये अवघ्या 18 वर्षाच्या तरुणासह एक व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मृतांमध्ये तरुणासह एका प्रौढाचा समावेश आहे. भूषण अनिल पाटील (वय 18 वर्ष) आणि विक्रम दौलत चौधरी (वय 57 वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही तळई गावातीलच रहिवासी होते.
ADVERTISEMENT
Monsoon 2021 : महाराष्ट्रासाठी पुढचे ५ दिवस धोक्याचे, IMD कडून अलर्ट जाहीर
ADVERTISEMENT
विक्रम चौधरी व भूषण पाटील हे दोघे जण हे आपआपल्या शेतात गेलेले होते. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास तळई शिवारात विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे ते घरी परतण्यास निघाले होते. याचवेळी अचानक अंगावर वीज कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला. दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान, एकाच गावातील दोन जणांचा वीज कोसळून झाल्यामुळे मृत्यूच्या घटनेमुळे तळई गावावर एकच शोककळा पसरली आहे. (Two persons from the same village in Jalgaon died due to lightning)
पाहा हवामान खात्याने पुढील काही दिवसांसाठी नेमका काय अंदाज वर्तवला आहे:
IMD ने मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबईत पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. पुढचे चार ते पाच दिवस असाच पाऊस कोसळणार आहे. त्या अनुषंगाने हा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईसह कोकण किनारपट्टीवरही येत्या चार ते पाच दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने हा अंदाज वर्तवला असून पुढचे चार ते पाच दिवस हे मुसळधार पावसाचे असणार आहेत हे स्पष्ट करण्यात आलं आहे.
रायगड जिल्ह्यालाही अतिवृष्टीचा धोका, जिल्हाधिकाऱ्यांकडून सतर्कतेचे आदेश
आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये मान्सूनचं आगमन झालेलं आहे. अनेक ठिकाणी सध्या जोरदार पाऊस पडत आहे.
कोकण किनारपट्टीला आज काही ठिकाणी रेड अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. मुंबईत पुढच्या चार दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढचे चारही दिवस या सगळ्या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT