मोदींचं नाव, नोटबंदीचा उल्लेख… उद्धव ठाकरेंचा जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत गौप्यस्फोट
उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे यांच्यातला वाद केंद्रीय निवडणूक आयोगात गेल्यानंतर आता धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलंय. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंना अंतिम निकाल येईपर्यंत आपापलं चिन्ह निवडावं लागणार आहे. ठाकरे गटात हालचाली सुरू असून, उद्धव ठाकरेंच्या नेते पदाधिकाऱ्यांसोबत बैठका सुरू आहेत. दरम्यान, जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत बोलताना ठाकरेंनी मोठं विधान केलंय. शिंदेंच्या बंडामुळे उद्धव ठाकरेंवर धनुष्यबाण चिन्ह आणि […]
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे यांच्यातला वाद केंद्रीय निवडणूक आयोगात गेल्यानंतर आता धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलंय. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंना अंतिम निकाल येईपर्यंत आपापलं चिन्ह निवडावं लागणार आहे. ठाकरे गटात हालचाली सुरू असून, उद्धव ठाकरेंच्या नेते पदाधिकाऱ्यांसोबत बैठका सुरू आहेत. दरम्यान, जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत बोलताना ठाकरेंनी मोठं विधान केलंय.
ADVERTISEMENT
शिंदेंच्या बंडामुळे उद्धव ठाकरेंवर धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नावाशिवाय निवडणुकीला सामोरं जाण्याची वेळ आलीये. केंद्रीय निवडणूक आयोगानं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं असून, ठाकरेंकडून नवं चिन्ह आणि पक्षाच्या नावाबद्दल नेते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा सुरूये.
उद्धव ठाकरेंनी गटाच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली असून, त्यापूर्वी त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे सर्व जिल्हाप्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत बोलताना उद्धव ठाकरेंनी २०१९ मध्ये झालेल्या युतीबद्दलचा किस्सा ऐकवला.
हे वाचलं का?
shiv sena symbol freeze : निवडणूक आयोग आमचा बाप नाहीये, तो केंद्राचा वेठबिगार; अरविंद सावंत भडकले
उद्धव ठाकरे जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत काय म्हणाले?
मातोश्रीवरून उद्धव ठाकरेंनी जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला. ठाकरे म्हणाले, ” नोटबंदीनंतर पंतप्रधान मोदींचं नाणं खोटं ठरलय. हे नाणं घासून घासून वापरलं जातंय. त्यामुळेच 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपला युतीसाठी आपल्याकडे यावं लागलं”, असा दावा ठाकरेंनी केला.
ADVERTISEMENT
“महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाशिवाय भाजपला पर्याय नाही हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे ते आपले नाव पुसण्याचा प्रयत्न करत आहेत. ही आपली शेवटची मोठी लढाई आहे”, असंही ठाकरे म्हणाले.
ADVERTISEMENT
निवडणूक आयोगाकडून गोठवण्यात आलेला धनुष्यबाण शिवसेनेला नेमका कसा मिळाला होता?
याच बैठकीत ठाकरेंनी आपल्या पदाधिकऱ्यांमध्ये ऊर्जा भरण्याचा प्रयत्नही केलाय. “याआधीही माझा स्वतःचा भाऊ (राज ठाकरे) आणि बाळासाहेब ठाकरेंच्या काही जवळच्या विश्वासूंनी आपला विश्वासघात केला. पण आपण त्या सर्वांचा पराभव केला. त्यांना पुरुन उरलो. आता ही शेवटची मोठी लढाई आपल्याला जिंकायची आहे. मग महाराष्ट्रात कोणीही आपल्यासमोर टिकू शकणार नाही”, असं ठाकरेंनी जिल्हाप्रमुखांशी संवाद करताना सांगितलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT