हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंचा थेट मोहन भागवतांना सवाल; मशिद भेटीवरच ठेवलं बोट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

हिंदुत्वावरून भाजप आणि शिंदे गटाकडून सातत्यानं लक्ष्य केलं जात असताना उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातून पलटवार केला. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना सवाल करत ठाकरेंनी हिंदुत्वारून होणाऱ्या टीकेला उत्तर दिलं.

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे म्हणाले, “माझं स्पष्ट मत आहे की, आता देशातली लोकशाही जिवंत राहते की नाही हा प्रश्न आहे. मागे भाजपचे अध्यक्ष येऊन बोलले की, शिवसेना संपत चाललीये. देशात दुसरे पक्ष शिल्लक राहणार नाही. सगळ्यांना सावधानतेचा इशारा देतोय. आपला देश हुकुमशाहीकडे चाललाय. भारत माता हुकुमशाहीकडे नेली जातेय. देशात पुन्हा गुलामगिरी येऊ शकते. ही गुलामगिरी तुम्हाला परवडणार आहे का? तुम्ही कोणत्याही धर्माचे असा पण एकत्र येऊन देशाचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची वेळ आलीये”, असं विधान ठाकरेंनी केलं.

उद्धव ठाकरेंनी मोहन भागवतांना काय केले सवाल?

“मोहन भागवतांबद्दल मला आदर आहे. मधल्या काळात मोहन भागवत मशिदीत जाऊन आले. का? हिंदुत्व सोडलं? का मिंधे गटाने नमाज पठण करायला सुरूवात केलीये. कशासाठी गेले होते मोहन भागवत. मोहन भागवत संवाद करायला गेले होते. मुस्लिमांनी सांगितलं की, मोहन भागवत राष्ट्रपिता आहेत. आम्ही म्हणालो होतो भागवतांना राष्ट्रपती करा. तुम्ही नाही ऐकलं. त्यामागे त्यांचं काय पाऊल असेल, मला माहिती नाही. ते मुस्लिमांबरोबर बोलले की, त्यांचा संवाद सुरुये. राष्ट्रीय कार्य सुरूये. आणि आम्ही काँग्रेससोबत गेलो की, हिंदुत्व सोडलं. कुठले धागेदोरे कुठे लावताहेत. आणि कसला आभास निर्माण करताय”, असं म्हणत ठाकरेंनी शिंदे गटाला प्रत्युत्तर दिलं.

हे वाचलं का?

“आज मोहन भागवत महत्त्वाचं बोलले. स्त्री-पुरुष समानता असली पाहिजे. ते बरोबर बोलले. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचीही तिच शिकवण आहे. आमचं दैवत मातृभक्तच होतं. मोहनजी, मला विचारायचं, तुम्ही ज्या महिला शक्तीचा उल्लेख केला. दोन घटनांबद्दल मला प्रश्न विचारायचेत”, असं ठाकरे म्हणालेत.

“उत्तराखंडमध्ये अंकिता भंडारी नावाच्या मुलीचा खून झाला. तिच्या बातमीमध्ये असं होतं की, तिचा मृतदेह भाजप नेत्याच्या रिसॉर्टच्या बाजूला आढळलं. हा महिला शक्तीचा आदर? खून का झाला? तर तो हॉटेल मालकाला येणाऱ्या जाणाऱ्याबद्दल काय चालवायचं होतं, त्याला नकार दिला म्हणून. कुठेय महिलाशक्तीचा आदर?”, असा उद्धव सवाल ठाकरेंनी उपस्थित केला.

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे दसरा मेळावा २०२२ : आमचं हिंदुत्व शिवछत्रपतींचं!

“बिलकिस बानो. त्या दंगलीत गर्भवती होती. तिच्यावर बलात्कार झाला. तिच्या साडेतीन वर्षांच्या मुलीचा आपटून खून करण्यात आला. आरोपी पकडले. त्यांना शिक्षा झाली. आता त्यांना सोडून देण्यात आलं. इतकंच नाही, तर सुटल्यावर त्यांचं सत्कार करून स्वागत करण्यात आलं. हे जर आपल्या पक्षात आणि अनुयायांकडून घडत असेल, तर काय? आमचं हिंदुत्व असं नाही. तर स्त्री शक्तीचा सन्मान करणारं आमचं हिंदुत्व आहे”, असं म्हणत ठाकरेंनी हिंदुत्वावरून थेट भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीकास्त्र डागलं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT