आम्हाला शिकवू नका, Central Vista वरून मोदी सरकारचं काँग्रेसला प्रत्युत्तर
Central Vista प्रकल्पावरून आम्हाला काँग्रेसने काहीही शिकवण्याची गरज नाही, असं म्हणत मोदी सरकारने काँग्रेसला प्रत्युत्तर दिलं आहे. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावरून काँग्रेसने जी टीका केली आहे त्या टीकेला आता मोदी सरकारने उत्तर दिलं आहे. सेंट्रेल व्हिस्टा प्रकल्पाचं बजेट हे 20 हजार कोटी रूपये आहे. तर भारताचं एका वर्षाचं आरोग्य बजेट हे 3 लाख कोटी रूपये आहे. […]
ADVERTISEMENT
Central Vista प्रकल्पावरून आम्हाला काँग्रेसने काहीही शिकवण्याची गरज नाही, असं म्हणत मोदी सरकारने काँग्रेसला प्रत्युत्तर दिलं आहे. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावरून काँग्रेसने जी टीका केली आहे त्या टीकेला आता मोदी सरकारने उत्तर दिलं आहे. सेंट्रेल व्हिस्टा प्रकल्पाचं बजेट हे 20 हजार कोटी रूपये आहे. तर भारताचं एका वर्षाचं आरोग्य बजेट हे 3 लाख कोटी रूपये आहे. आम्हाला आमची जबाबदारी व्यवस्थित कळते त्यावरून आम्हाला कोणीही शिकवण्याची गरज नाही असं म्हणत मोदी सरकारने काँग्रेसच्या टीकेला उत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT
There are hundreds of projects being executed by various depts. Governance hasn’t come to a standstill, unlike the Congress’s times of policy paralysis.
Central Vista is just another ongoing project. It’s only the Congress that’s obsessed about it, nobody else. pic.twitter.com/RSTfL5HLLe
— Hardeep Singh Puri (@HardeepSPuri) May 7, 2021
शेकडो प्रकल्प सध्या देशात सुरू आहेत. मोदी सरकारला काँग्रेस सरकारप्रमाणे धोरण लकवा मारलेला नाही. सेंट्रल व्हिस्टा हा प्रकल्प सुरू आहे मात्र त्यावरून काँग्रेसच्या पोटात दुखतं आहे असंही हरदीप सिंग पुरी यांनी काँग्रेसला सुनावलं आहे. आम्हाला नावं ठेवणारं काँग्रेस महाराष्ट्रात एमएलए हॉस्टेल उभारतं आहे, छत्तीसगढमध्ये नवं विधानभवन उभारलं जातं आहे. त्याचं काय? आम्ही जर सेंट्रल व्हिस्टाची उभारणी केली तर काँग्रेसच्या पोटात का दुखतं आहे? असाही प्रश्न हरदीप सिंग पुरी यांनी विचारला आहे.
देशातले लोक कोरोनाने मरत असताना Central Vista ची गरजच काय?-राहुल गांधी
हे वाचलं का?
राहुल गांधींनी काय म्हटलं होतं?
देशातले लोक कोरोनाने मरत असताना Central Vista प्रकल्पाची गरज काय असा प्रश्न राहुल गांधी यांनी विचारला आहे. लॉकडाऊन सुरू असताना आणि लोक कोरोनाने मरत असताना हा प्रकल्प इतका जरूरी आहे का? या प्रकल्पाचा समावेश अत्यावश्यक सेवांमध्ये का करण्यात आला आहे? असेही प्रश्न विचारण्यात येत आहेत. सुप्रीम कोर्टात या प्रकल्पाचं बांधकाम थांबवण्यात यावं म्हणून याचिका दाखल करण्यात आली होती. ती याचिका स्वीकारलीच गेली नाही. आता सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावरून देशातल्या आणि आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांकडून मोदी सरकारवर टीका होते आहे. अशात राहुल गांधी यांनीही ट्विट करून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
ADVERTISEMENT
What is Central vista Project? काय आहे सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प?
ADVERTISEMENT
सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाची घोषणा सप्टेंबर 2019 मध्ये करण्यात आली होती. या प्रकल्पाच्या अंतर्गत त्रिकोणी आकाराच्या नव्या संसद भवानाची निर्मिती केली जाणार आहे. ज्या संसद भवनात 900 ते 1200 खासदारांची आसन क्षमता असणार आहे. हा प्रकल्प 2022 पर्यंत पूर्ण केला जणार आहे. 2022 मध्येच भारताचा 75 वा स्वातंत्र्यदिन असणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत पंतप्रधानांचं निवासस्थान नव्याने बांधलं जाणार असून नव्या संसदेचीही निर्मिती केली जाणार आहे. 10 डिसेंबरला या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं आहे. कोरोनाची दुसरी लाट असतानाही हा प्रकल्प हा अत्यावश्यक सेवांमध्ये गणण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकल्पाचं काम थांबलेलं नाही.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT