सट्ट्याचा लकी नंबर सांगायचा मंदिराचा पुजारी, हरल्यानंतर सट्टेबाजाने केली पुजाऱ्याची हत्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सट्ट्याचा लकी नंबर पुजारी सांगायचा. तो नंबर लावून जिशान नावाचा सट्टेबाज सट्टा लावायचा. तो हरल्याने त्याने या पुजाऱ्याची हत्या केली. जिशान नावाच्या सट्टेबाजाने पुजाऱ्याला सट्टा हरल्याने ठार केलं. त्याने या पुजाऱ्याला 72 हजार रूपये दिले होते. या बदल्यात पुजाऱ्याने त्याला नंबर सांगितला. तो नंबर या सट्टेबाजाने लावला, मात्र तो नंबर लकी नंबर ठरला नाही. त्यानंतर या जिशान नावाच्या सट्टेबाजाने या पुजाऱ्याची हत्या केली. उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये ही घटना घडली आहे.

ADVERTISEMENT

काय घडली घटना?

हे वाचलं का?

बिजनौरमधल्या नांगल या ठिकाणी 12 डिसेंबरला महाकाली मंदिराच्या पुजाऱ्याची हत्या करण्यात आली. ही घटना बिजनौर या ठिकाणी असलेल्या मासळी बाजार भागात झाली. एका जाड दंडुक्याने जिशानने पुजाऱ्यावर वार केले. त्याला मारहाण करून त्याची हत्या जिशानने केली. मंदिराचा पुजारी असलेल्या रामदास गिरी हा जिशानला सट्ट्यासाठी लकी नंबर जिशानला सांगत होता.

सट्ट्याचा लकी नंबर सांगण्यासाठी जिशान नावाच्या सट्टेबाजाने बाबा रामदास गिरी यांना 21 हजार रूपयांचा मोबाईल आणि 51 हजार रूपये रोख दिले होते. त्या बदल्यात या पुजाऱ्याने त्याला लकी नंबर सांगितला. मात्र त्या लकी नंबरवर सट्टा लागला नाही. जिशान आणि पुजाऱ्यामध्ये या विषयावरून वाद झाला होता. यानंतर जिशान मंदिरात गेला होता तिथे जिशान आणि पुजारी यांच्यात वादावादी झाली. तिथे त्याने या पुजाऱ्याला दंडुक्याने मारहाण केली. ही मारहाण एवढी जबरदस्त होती की त्यातच पुजाऱ्याचा मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी सर्विलन्स लावला आणि जिशानला अटक केली.

ADVERTISEMENT

जिशानची जेव्हा कसून चौकशी केली तेव्हा त्याने पोलिसांना सांगितलं की या पुजाऱ्यामुळे माझं पाच लाख रूपयांचं नुकसान झालं आहे. त्याबदल्यात या पुजाऱ्याने माझ्याकडून पैसे उकळले, मोबाईल उकळला होता. पण मला मोठं नुकसान झालं त्यामुळे मी हत्या केली असं जिशानने चौकशीत सांगितलं. पोलिसांनी त्या दंडुक्यासहीत जिशानला अटक केली आहे. त्याला आता गजाआड करण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT