UP Cabinet Expansion: यूपी निवडणुकीसाठी भाजपने कसली कंबर, 7 नव्या मंत्र्यांचा शपथविधी
लखनौ: उत्तर प्रदेशच्या योगी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रविवारी लखनऊच्या राजभवनात पार पडला. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात सात नव्या चेहऱ्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये सामील झालेले जितिन प्रसाद, भाजप नेते पलटू राम, संगीता बिंद हे नेते आता मंत्री झाले आहेत. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी […]
ADVERTISEMENT
लखनौ: उत्तर प्रदेशच्या योगी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रविवारी लखनऊच्या राजभवनात पार पडला. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात सात नव्या चेहऱ्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये सामील झालेले जितिन प्रसाद, भाजप नेते पलटू राम, संगीता बिंद हे नेते आता मंत्री झाले आहेत. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी सात नेत्यांना शपथ दिली आहे. दरम्यान, या मंत्रिमंडळ विस्तारातून भाजपने विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केल्याचं दिसून येत आहे.
यूपीए सरकारमध्ये मंत्री असलेले जितिन प्रसाद यांना योगी सरकारमध्ये मंत्री बनवण्यात आले आहे. ते एक ब्राह्मण चेहरा आहेत. त्यांनी जूनमध्ये काँग्रेसला अलविदा करून भाजपमध्ये प्रवेश केला होता. जितिन प्रसाद हे अद्याप आमदार नाहीत.
हे वाचलं का?
यूपी सरकारने जितिन प्रसाद यांना अन्य तीन नेत्यांसह विधान परिषदेत आणण्यासाठी नावे पाठवली आहेत. 2004 मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेत पोहोचले होते. जितिन प्रसाद यांचे वडील जितेंद्र प्रसाद हे काँग्रेसचे दिग्गज नेते होते.
यूपी सरकारमध्ये छत्रपाल गंगवार यांनाही मंत्री करण्यात आले आहे. ते बरेलीच्या बहेरीचे आमदार आहेत. 2007 मध्ये पहिल्यांदा ते विधानसभेत निवडून गेले होते. गंगवार यांनी 2017 मध्ये दुसऱ्यांदा विधानसभा निवडणूक जिंकली असून ते भाजपचे जिल्हा मंत्री राहिले आहेत. यूपीच्या बलरामपूरचे आमदार पल्टू राम यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.
ADVERTISEMENT
ते प्रथमच आमदार झाले आहेत आणि ते अनुसूचित जातीचे नेते आहेत. यानंतर, डॉ संगीता बलवंत बिंद यांनीही मंत्री म्हणून शपथ घेतली. संगीता बिंद या सध्या गाझीपूर सदरच्या आमदार आहेत. त्या पक्षाच्या मागास जातीच्या नेत्या आहेत.
ADVERTISEMENT
2017 मध्ये ओबरा मतदारसंघातून आमदार बनलेल्या संजय कुमार गोंड यांनाही मंत्री करण्यात आले आहे. राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी संजयकुमार यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. त्याचबरोबर दिनेश खाटीक यांना राज्यमंत्रीही करण्यात आले आहे. ते मेरठमधील हस्तिनापूरचे आमदार आहेत आणि अनुसूचित जातीचे आहेत.
MOOD OF THE NATION : कोणत्या मुख्यमंत्र्यांचं काम ‘भारी’?; उद्धव ठाकरे कितव्या स्थानी?
उत्तर प्रदेश विधान परिषदेचे सदस्य धर्मवीर प्रजापती यांना योगी सरकारमध्ये राज्यमंत्री बनवण्यात आले आहे. त्यांनी राजभवनात मंत्री म्हणून शपथ घेतली. प्रजापती यांनी राज्य भाजपमध्ये महत्त्वाचे पद भूषवले असून ते आग्राचे रहिवासी आहेत.
दरम्यान, या मंत्रिमंडळ विस्तारानंतर भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत यूपीमधील जनता पुन्हा भाजपच्या हाती सत्ता देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT