गोरखनाथ मंदिराबाहेरील हल्ला.. जाणून घ्या काय-काय घडलं आत्तापर्यंत?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गोरखपूर: गोरखपूरमधील गोरखनाथ मंदिराजवळ सुरक्षा झालेल्या हल्ल्याप्रकरणी आता अनेक नवे खुलासे होत आहेत. हल्लेखोर नुकताच नेपाळलाही जाऊन आल्याचे तपासात समोर आले आहे. त्याच्याकडून अनेक संशयास्पद कागदपत्रेही पोलिसांना सापडली आहेत. अशा परिस्थितीत त्याचे दहशतवादी कनेक्शन असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे.

ADVERTISEMENT

अहमद मुर्तजा अब्बासी नावाच्या व्यक्तीने गोरखनाथ पीठात शस्त्र उगारल्यानंतर खळबळ उडाली होती. त्याने पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला करून त्यांना जखमी केले होते. तसेच मंदिराजवळ उपस्थित लोकांना धारदार शस्त्राने घाबरवण्याचा प्रयत्न केला. हल्ल्यादरम्यान मुर्तजाने अल्लाह-हू-अकबरचा नाराही दिल्याचं म्हटलं जात आहे.

सीएम योगी पोहोचले गोरखपूरला

हे वाचलं का?

या हल्ल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वत: गोरखपूर गाठले आणि प्रथम जखमी पोलिसांची भेट घेतली. नंतर त्यांनी थेट गोरखनाथ मंदिर गाठले. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री योगी यांना याबाबतचे सगळे अपडेट दिले. यानंतर सीएम योगीही हे ज्या ठिकाणी हल्ला झाला तिथेही गेले.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. वास्तविक, रविवारी सायंकाळी उशिरा ही घटना घडली. प्रचंड सुरक्षा असलेल्या या मंदिर परिसरात अशा प्रकारे हल्ला झाल्याचे पाहून सगळेच चक्रावून गेले. गोरखधामच्या गेट क्रमांक एकवर असलेल्या 2 सुरक्षा कर्मचाऱ्यांना जखमी करून मंदिरात प्रवेश करण्याचा अयशस्वी प्रयत्न करणारी ही व्यक्ती नेमकी आहे तरी कोण याबाबत आता जोरदार चर्चा सुरु झाली आहे?

ADVERTISEMENT

दहशतवादी कनेक्शन असण्याची शक्यता, यूपी पोलिसांचा दावा

ADVERTISEMENT

त्याचा हेतू काय होता? त्याने हे का केले? या संपूर्ण प्रकरणात दहशतवादी कारस्थान असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे उत्तर प्रदेश पोलिसांचे म्हणणे आहे. एडीजी कायदा आणि सुव्यवस्था प्रशांत कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन हा दावा केला. या हल्ल्याच्या तपासात गुंतलेल्या एटीएस आणि एसटीएफच्या पथकाला अनेक खळबळजनक कागदपत्रे मिळाली आहेत.

नेपाळ आणि कोईम्बतूरला गेला होता मुर्तजा

आरोपी अहमद मुर्तजा अब्बासी हा कट्टरतावादी होण्यासाठी ऑनलाइन प्रशिक्षण घेत असल्याचे तपासात उघड झाले आहे. धर्माच्या नावाखाली तो स्वत:ला कुर्बानी देणारा समजू लागला होता. अलीकडच्या काळात अब्बासी नेपाळ, कोईम्बतूर आणि लुंबिनी येथे गेल्याचेही कळते. त्याच्याकडून अनेक बँकांचे एटीएम कार्डही सापडले आहेत. तसेच उर्दूमध्ये लिहिलेले साहित्यही जप्त करण्यात आले आहे.

आयआयटी मुंबईतून इंजिनिअरिंग, रिलायन्समध्ये नोकरी; कोण आहे गोरखनाथ मंदिराबाहेर हल्ला करणारी व्यक्ती

मुर्तजा दहशतवादी असल्याचं वडिलांनी नाकारलं

एकीकडे यूपी पोलिसांचे असे मत आहे की, हल्लेखोराचे दहशतवादी कनेक्शन असण्याची दाट शक्यता आहे. तर दुसरीकडे त्याच्या कुटुंबीयांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. अहमद मुर्तजा हा लहानपणापासूनच मानसिक रुग्ण असल्याचे त्याच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. वडील मुनीर अहमद अब्बासी यांनी कोणत्याही प्रकारे मुर्तजाचे दहशतवादी कनेक्शन नाही असा दावा केला आहे.

एटीएस आणि आयबीचे पथक करणार चौकशी

दरम्यान, आरोपी अहमदला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यादरम्यान एटीएस आणि आयबीचे पथकही चौकशी करतील जेणेकरून हल्ल्यातील प्रत्येक सत्य बाहेर येऊ शकेल.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT