उत्तराखंड दुर्घटना : मृतांचा आकडा ३२ वर, १९७ जण अजुनही बेपत्ता
उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात हिमकडा कोसळून झालेल्या हानीत मृतांचा आकडा आता ३२ वर पोहचला आहे. अजुनही १९७ जणं बेपत्ता असून बचावपथकाचं कार्य अजुनही सुरुच आहे. रविवारी हिमकड्याचा एक भाग नदीत कोसळल्यामुळे अलकनंदा आणि धौलीगंगा नदीच्या पातळीत वाढ झाली होती. याचा फटका लगतच्या गावांना बसला. अनेक घरं या पुरामध्ये वाहून गेली. राज्य सरकारने यानंतर सतर्कतेचे आदेश दिले […]
ADVERTISEMENT
उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात हिमकडा कोसळून झालेल्या हानीत मृतांचा आकडा आता ३२ वर पोहचला आहे. अजुनही १९७ जणं बेपत्ता असून बचावपथकाचं कार्य अजुनही सुरुच आहे. रविवारी हिमकड्याचा एक भाग नदीत कोसळल्यामुळे अलकनंदा आणि धौलीगंगा नदीच्या पातळीत वाढ झाली होती. याचा फटका लगतच्या गावांना बसला. अनेक घरं या पुरामध्ये वाहून गेली. राज्य सरकारने यानंतर सतर्कतेचे आदेश दिले असून ऋषिकेश, हरिद्वार येथील नदीकाठच्या लोकांना स्थलांतरित करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
हिमकडा कोसळून झालेल्या अपघातात NTPC च्या तपोवन-विष्णुगड हायड्रोपॉवर प्रोजेक्टचंही मोठं नुकसान झालं आहे. येथे कामासाठी असणारे अनेक कामगार अजुनही ढिगाऱ्याखाली अडकून असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. भारतीय लष्कराचे ६०० पेक्षा अधिक जवान, इंडो-तिबेटीएन बॉर्डर पोलीस, एनडीआरएफ आणि राज्य सरकारची बचावपथक अजुनही या भागात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम करत आहेत.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन चमोलीत सुरु असलेल्या बचावकार्याची माहिती देत मदतीसाठी आलेल्या भारतीय लष्करासह, ITBP, NDRF च्या जवानांचे आभार मानले आहेत.
हे वाचलं का?
चमोली में आई प्राकृतिक आपदा को लेकर हमारी सरकार बेहद संजीदा है। सेना, एयरफोर्स, आईटीबीपी, एनडीआरएफ, एसडीआरएफ व पुलिस प्रशासन के जवान तथा स्वास्थ्य, राजस्व, आपदा प्रबंधन विभाग एवं स्थानीय जनता पूरी मुस्तैदी से राहत एवं बचाव कार्यों में जुटे हैं। pic.twitter.com/vJLCO9rgJw
— Trivendra Singh Rawat (@tsrawatbjp) February 9, 2021
आपदा प्रभावित क्षेत्रों में राशन वितरण, स्वास्थ्य सेवा, कनेक्टिविटी को सुचारू बनाने के लिए सरकार पूरी तरह प्रयासरत है। केंद्र सरकार से हमें हरसंभव मदद मिल रही है इसके लिए हम माननीय प्रधानमंत्री श्री @NarendraModi जी और केंद्र सरकार के आभारी हैं। pic.twitter.com/RGmk7TlP3W
— Trivendra Singh Rawat (@tsrawatbjp) February 9, 2021
या अपघातानंतर रैनी पाली, पांग, लाटा, सुरैथोटा, सुकी, भालगाव, टोलमा, फग्रुसु अशा अनेक छोट्या गावांमधली रस्ते वाहतूक बंद झाली आहे. ITBP चे जवान या गावात गरजेच्या वस्तू पोहचवण्याचं काम करत आहेत.
तपोवन बोगद्यात बचावकार्यासाठी भारतीय नौदलाचे जवान, डायव्हर्स तैनात करण्यात आले आहेत. हिमकडा कोसळल्यानंत तपोवन बोगद्यातील पाण्याची पातळी ही सातत्याने वाढत आहे. त्यातच या बोगद्यात किमान २५ ते ३० कामगार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून त्यांचा पत्ता लागत नाहीये. गृहमंत्री अमित शहा यांनीही मंगळवारी संसदेत उत्तराखंड अपघातात सरकारी यंत्रणा बचावकार्यात काय मदत करत आहेत याची माहिती दिली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT