मुंबईतील 62 खासगी रुग्णालयात आजपासून पुन्हा लसीकरण सुरू, ही आहे रुग्णालयांची यादी
मुंबई: मुंबई महानगरपालिकेला कोविड-19 लस साठा उपलब्ध झाल्याने आजपासून (12 एप्रिल, सोमवार) मुंबईतील निर्देशित 71 पैकी 62 खासगी रुग्णालयात कोविड लसीकरण पुन्हा सुरू होणार आहे. (vaccination resumes in 62 private hospitals in mumbai from today here is the list of hospitals) मुंबई महानगरपालिका आणि शासन यांच्यातर्फे मुंबईत 49 तर खासगी रुग्णालयात 71 लसीकरण केंद्रं कार्यान्वित […]
ADVERTISEMENT
मुंबई: मुंबई महानगरपालिकेला कोविड-19 लस साठा उपलब्ध झाल्याने आजपासून (12 एप्रिल, सोमवार) मुंबईतील निर्देशित 71 पैकी 62 खासगी रुग्णालयात कोविड लसीकरण पुन्हा सुरू होणार आहे. (vaccination resumes in 62 private hospitals in mumbai from today here is the list of hospitals)
ADVERTISEMENT
मुंबई महानगरपालिका आणि शासन यांच्यातर्फे मुंबईत 49 तर खासगी रुग्णालयात 71 लसीकरण केंद्रं कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. या सर्व केंद्रांवर मिळून मुंबई महानगरपालिका क्षेत्रात प्रतिदिन सरासरी 40 ते 50 हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात येते.
मुंबईत लसीकरणासाठी मंजुरी मिळालेल्या 71 खासगी रुग्णालयात, शनिवार, 19 एप्रिल 2021 आणि रविवार, दिनांक 11 एप्रिल 2021 असे दोन दिवस लसीकरण थांबले होते. तथापि, मुंबई महानगरपालिकेच्या तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरु होते.
हे वाचलं का?
लससाठा अधिक प्रमाणावर उपलब्ध होताच खासगी रुग्णालयातही लसीकरण पुनश्च सुरु केले जाईल, असे महानगरपालिकेने यापूर्वीच स्पष्ट केले होते.
Corona Vaccination: तुटवडा भासूनही महाराष्ट्रात 1 कोटींपेक्षा जास्त लसी देण्याचं लक्ष्य पूर्ण
ADVERTISEMENT
पाहा कोणकोणत्या खासगी रुग्णालयात आजपासून पुन्हा कोरोना प्रतिबंधक लस मिळणार:
ADVERTISEMENT
मुंबईतील 62 खासगी रुग्णालयात आपल्याला कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होणार आहे. पाहा या रुग्णालयाची यादी
Remdesivir इंजेक्शनविषयी एक महत्त्वाची बातमी, केंद्रीय पथकाने पाहा काय दिलेत निर्देश
शुक्रवार, दिनांक 9 एप्रिल 2021 रोजी रात्री उशिरा 99 हजार लसी आणि शनिवार, दिनांक 10 एप्रिल 2021 रोजी 1 लाख 34 हजार 970 अशा एकूण 2 लाख 33 हजार 970 लसींच्या मात्रा मागील दोन दिवसात मुंबई महानगरपालिकेला उपलब्ध झाल्या आहेत. त्यातून खासगी रुग्णालयात लसीकरण केंद्रासाठी लस साठा वितरित करण्यात आला आहे.
यामुळे आजपासून पुन्हा एकदा नियमित वेळेत 71 पैकी 62 खासगी लसीकरण केंद्र देखील सुरु राहणार आहेत.
महाराष्ट्रात Lockdown शिवाय आता पर्याय नाही, टास्क फोर्सचंही हेच मत -राजेश टोपे
दरम्यान, मागील काही दिवसांपासून कोरोना प्रतिबंधक लसींचा केंद्र सरकारकडून पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी राज्य सरकारकडून सातत्याने करण्यात येत होता. आता पुन्हा एकदा लसींचा साठा उपलब्ध झाल्याने मुंबईत लसीकरणाला जोरदार सुरुवात झाली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT