धक्कादायक ! पतीला डांबून गुंडाचा महिलेवर बलात्कार, पोलिसांनी भररस्त्यात काढली आरोपीची धिंड
विविध प्रकारच्या गुन्ह्यांमधून परिसरात आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका कुख्यात गुंडाला वसईतल्या तुळींज पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. कुख्यात गुंड मोनू रायडरला बलात्काराच्या प्रकरणाखाली अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला हातात बेड्या ठोकून दोन तास पायी चालवत धिंड काढली. लोकांच्या मनातून गुन्हेगाराविषयीची भीती कमी व्हावी यासाठी पोलिसांनी ही धिंड काढल्याचं कळतंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुख्यात […]
ADVERTISEMENT
विविध प्रकारच्या गुन्ह्यांमधून परिसरात आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका कुख्यात गुंडाला वसईतल्या तुळींज पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. कुख्यात गुंड मोनू रायडरला बलात्काराच्या प्रकरणाखाली अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला हातात बेड्या ठोकून दोन तास पायी चालवत धिंड काढली. लोकांच्या मनातून गुन्हेगाराविषयीची भीती कमी व्हावी यासाठी पोलिसांनी ही धिंड काढल्याचं कळतंय.
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुख्यात गुंड निशांत मिश्रा उर्फ मोनू रायडरने एका घरात घुसून महिला व तिच्या पतीला मारहाण केली. यानंतर मोनूच्या साथीदारांनी महिलेच्या पतीला दुचाकीवर बसवून एका निर्जन ठिकाणी नेलं. या ठिकाणी मोनूच्या साथीदारांनी महिलेच्या पतीला डांबून ठेवलं. दरम्यान मोनूने पीडित महिलेवर दोनवेळा बलात्कार करुन तिच्या शरिरावर जखमाही केल्या.
वसईत कुख्यात गुंडाची पोलिसांनी भर रस्त्यात काढली धिंड pic.twitter.com/6FAmnFNXs4
— Mumbai Tak (@mumbaitak) January 23, 2022
इतकच नव्हे तर यानंतर मोनूने तिच्या घरातली काही रक्कमही लुटून नेली. आरोपीच्या साथीदारांनी महिलेच्या पतीला दोन तास आचोळे परिसरात डांबून ठेवलं होतं. दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजल्याच्या दरम्यान या महिलेच्या पतीची सुटका करण्यात आली होती.
हे वाचलं का?
या धक्कादायक प्रकारानंतर पीडित महिलेनं तुळींज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी बलात्कार, अपहरण, दरोडा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करून आरोपी मोनू रायडरला मीरा रोड परिसरातून अटक केली होती. विशेष म्हणजे आरोपी मोनू रायडरवर विविध पोलीस ठाण्यात खून, दरोडा, प्राणघातक हल्ला असे एकूण १६ गुन्हे दाखल आहेत. त्याची दहशत संपवण्यासाठी शनिवारी पोलिसांनी त्याला प्रगतीनगर परिसरातून धिंड काढली.
नांदेडच्या धर्माबाद रेल्वे स्टेशनवर थांबलेल्या महिलेचे दागिने लुटले, दोघांनी केला बलात्कार
ADVERTISEMENT
नागरिकांसोबत गुंडगिरी करणाऱ्या गुन्हेगारांची गय केली जाणार नाही, असा इशारा देण्यासाठी पोलिसांनी कुख्यात गावगुंडाची धिंड काढल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.
ADVERTISEMENT
‘ती’ निघाली ‘तो’: मुलीच्या नावे इन्स्टा अकाऊंट; लेस्बियन दाखवून मुलींचे मागवायचा नग्न फोटो
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT