मुंबई : विलेपार्लेतील ते झाड का तोडण्यात आलं?; पोलिसांनी ताब्यात घेतलेली ‘ती’ व्यक्ती कोण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबईत वृक्ष तोडण्याच्या मुद्द्यावरून वाद उभा राहिला आहे. शहरातील विलेपार्ले भागातील एक व्हिडीओ शनिवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. पोलीस एका व्यक्तीला जबरदस्ती गाडीत बसवत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलीस आणि बृहन्मुंबई महापालिकेनं घटनेचा निषेध केला आहे.

ADVERTISEMENT

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील विलेपार्ले परिसरात असलेला एक १०० वर्ष जुना वृक्ष तोडण्यात येत होता. वृक्षतोड सुरू असताना पर्यावरण प्रेमी अभय आझाद याला विरोध केला. त्याचबरोबर झाड तोडण्याच्या परवानगीबद्दल अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले. त्यानंतर पोलीस झाड तोडण्यास विरोध करत असलेल्या अभय आझाद यांना बळजबरीने गाडीत बसवून घेऊन गेले. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याचं सांगितलं जात आहे.

हे वाचलं का?

घटनेबद्दल अभय आझाद यांनी त्यांचं म्हणणं मांडलं आहे. ‘राज्य सरकारने ५० वर्षापूर्वीची झाड वारसा वृक्ष म्हणून घोषित केली आहेत. हा तर १०० वर्षापूर्वीचा वृक्ष आहे. याचपद्धतीने झाडं तोडली गेली, तर वारसाच शिल्लक राहणार नाही.

मुंबई महापालिकेनं काय म्हटलंय?

ADVERTISEMENT

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आलं. यावर बृहन्मुंबई महापालिकेनंही भूमिका स्पष्ट केली आहे. पश्चिम रेल्वेच्या सहाव्या कॉरिडॉरच्या विस्तारीकरणाची योजना आहे. त्यासाठी आझाद रोडचा एक भाग रेल्वेला देण्यात आला आहे. त्यामुळे रस्ता लहान झाला असून, वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. रस्त्याचं विस्तारीकरण करण्यासाठी झाड हटवणं आवश्यक होतं आणि योग्य निर्देश देण्यात आलेले होते’, असं महापालिकेनं म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

शिवसेनेवर टीका

राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेनेचं सरकार असताना मुंबईतील आरे कॉलनीत मेट्रो-३ कारशेडसाठी वृक्षतोड केली जात होती. त्यावेळी शिवसेनेनं वृक्षतोडीला विरोध केला होता. आता तोच धागा पकडत शिवसेनेच्या दुहेरी भूमिकेवरही टीका केली जाऊ लागली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT