Ministry of Co Operation : सहकार मंत्र्यांचे स्वागत करायला काय हरकत आहे? – शिवसेना

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळ विस्तारात सहकार मंत्रालयाची स्थापना करण्यात आली असून गृहमंत्री अमित शाहा यांच्याकडे या नवीन मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली. अमित शाहांकडे सहकार मंत्रालयाची सूत्र जाताच, भाजप राज्यात सहकारी चळवळीच्या माध्यमातून उदयास आलेल्या नेत्यांना आता टार्गेट करणार अशा चर्चांना सुरुवात झाली. परंतू ‘सामना’ वृत्तपत्राच्या अग्रलेखातून शिवसेनेने आज नवे सहकारमंत्री अमित शाहांचं कौतुक केलंय.

ADVERTISEMENT

“या देशात सहकार चळवळीचं राजकारणच कोट्यवधी गरीब शेतकऱ्यांना जगवत असतं. गुपकार गँग सर्वच क्षेत्रात असली तरीही सहकार क्षेत्राचा नंबर त्यात शेवटचा आहे. हे क्षेत्र जगवणे, टिकवणे, त्याला बळ देणे हे केंद्राचे कर्तव्यच आहे. गृहमंत्री अमित शाहांनी सहकार मंत्रालयाची सूत्र हाती घेतल्यानंतर थरथराट वगैरे होण्याचं कारण नाही. अमित शाहा हे सहकार चळवळीचे कार्यकर्ते आहेत, त्यामुळे नव्या सहकार मंत्र्यांचे स्वागत करायला काय हरकत आहे?” असं मत आजच्या अग्रलेखात मांडण्यात आलं आहे.

Shiv Sena बाबत Nitesh Rane यांचं अत्यंत मोठं वक्तव्य, खा. राऊतांनी जाहीर कार्यक्रमात थोपटली पाठ

हे वाचलं का?

अमित शाहा यांच्याकडे सहकार मंत्रालयाचा कार्यभार आल्यामुळे अनेकांच्या मनात विचारांचे तरंग निर्माण झाले आहेत. शाहा यांच्याकडे सहकार खाते असल्यामुळे या क्षेत्रावर आकाश कोसळेल असे भय निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. शाहा महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राच्या नाड्या आवळतील, अनेक प्रकरणं खणून काढतील, काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावतील असं बोललं जात आहे, पण हे शाहा यांची बदनामी करणारं आहे असा बचावही शिवसेनेने आजच्या अग्रलेखातून केला आहे. राजकारण व सहकारात बरे-वाईट, खरे-खोटे, नैतिक-अनैतिक असं काहीच उरलं नसून जे काही घडतं ते सोयीनुसार घडतं असंही शिवसेनेने म्हटलंय.

Ministry of Co-Operation : सहकार चळवळीवर केंद्र गंडातर आणेल या बातम्यांना अर्थ नाही – शरद पवार

ADVERTISEMENT

अमित शाहा हे मुळचे सहकार क्षेत्रातले कार्यकर्ते आहेत, नंतर ते राजकारणात आले. महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्य सहकाराचे बालेकिल्ले आहेत. सहकार खात्यात अमित शाहा यांना सुधारणा करायच्या आहेत म्हणजे नक्की काय करायचं आहे हे आता समजेलच असं म्हणत शिवसेनेने अमित शाहा यांचं तोपर्यंत स्वागत करायला काय हरकत आहे असं म्हटलंय.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT