Swiss Bank : काळा पैसा स्वीस बँकेतच का ठेवला जातो? किती काळा पैसा भारतात परत आला?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोना काळातही स्वीस बँकेत 20 हजार 700 कोटींहून अधिक भारतीयांची रक्कम असल्याचं समोर आलंय….आता भारतातला जो काही काळा पैसा आहे, ब्लॅक मनी ज्याला म्हटलं जातं, तो याच स्वीस बँकेत आहे, असं म्हटलं जातं….पण ही स्वीस बँक आणि काळा पैसा याचं गौडबंगाल काय आहे? खरोखर स्वीस बँकेत काळा पैसा ठेवला जातो का? ही स्वीस बँक नेमकी आहे तरी काय? आणि भारतीयांचा किती पैसा या स्वीस बँकेत आहे, हेच आज समजून घेऊयात.

ADVERTISEMENT

1. सगळ्यात सुरूवातीला जाणून घेऊयात ही स्वीस बँक नेमकी आहे तरी काय?

तर बघा, स्वीस बँक अशा नावाची मुळातच कुठली एक बँक नाहीये. स्वीत्झर्लंड देशात 400 हून अधिक बँका आहेत, ज्यांना स्वीस बँक म्हणतात…आणि त्यात UBS आणि क्रेडिट स्वीस या दोन महत्वाच्या बँका आहेत. यातील UBS या बँकेत सगळ्यात जास्त पैसे ठेवले जातात. ती सगळ्यात जास्त फेमस आहे.

हे वाचलं का?

2. काळा पैसा लपवायचा असेल, किंवा कर चुकवायचा असेल, तर लोक स्वीस बँकेत पैसे ठेवतात, असं का म्हटलं जातं?

ADVERTISEMENT

– कारण स्वीस बँकमध्ये प्रचंड गोपनियता पाळली जाते…आणि ती तिथल्या बँकिंग कायद्याला धरूनच आहे. स्वीस बँकेत कुणाचं खातं आहे, त्यात किती पैसे आहेत, खातेदाराबाबतची माहिती ही कुणालाही दिली जात नाही.

ADVERTISEMENT

– शिवाय जर एखाद्या खातेदाराला आपली माहिती पूर्णत: गोपनिय ठेवायची असेल, तर तशीही सोय आहे. अशी खाती केवळ नंबरने उघडली जातात. म्हणजे अशा खात्याला खातेदाराचं नावंही नसतं. फक्त एक नंबर दिला जातो, आणि त्यावरूनच ते ऑपरेट होतं. या खात्यासंदर्भात बँकेतल्या बड्या अधिकाऱ्यांनाच माहिती असते.

– या बँकेत पैसे काढण्यासाठी आणि भरण्यासाठी अददीच मामुली कर लागतो…शिवाय पैसे ठेवण्यावर व्याज मात्र मजबूत मिळतं.

– स्वीस बँकेतील खातेदारांची माहिती किंवा किती पैसा आहे, याबाबत माहिती कुठेही देणं कायद्याने गुन्हा आहे.

याशिवाय UBS ही महत्वाची स्वीस बँक कर्मशीअल लोन फार कमी देतं, त्यामुळे पैसे बुडण्याची शक्यता कमी आहे. स्वीत्झर्लंडचं चलन स्वीस फ्रॅंक हे सुद्धा बऱ्यापैकी स्टेबल आहे, स्वीत्झर्लंड सरकार जागतिक राजकारणात तटस्थ म्हणजेच न्यूट्रल भूमिका घेतं, त्यामुळे आर्थिकदृष्ट्या त्यांचं चलन आणि सरकार दोन्ही स्टेबल असणं आणि गोपनियतेची हमी असल्याने स्वीस बँकेतील खाती ही जगात सगळ्यात जास्त सुरक्षित मानली जातात. आणि म्हणूनच काळा पैसा लपवायचा असेल, किंवा कर चुकवायचा असेल, तर अनेक जण आपला पैसा स्वीस बँकेत वळवतात असं म्हटलं जातं

समजून घ्या : महागाईने RBI का पडली चिंतेत? कशामुळे देशात उडाला महागाईचा भडका

3. भारतीयांचा किती काळा पैसा स्वीस बँकेत आहे?

– २०२० मध्ये भारतीय नागरिक आणि कंपन्यांनी स्विस बँकांमध्ये सुमारे २० हजार ७०० कोटी रुपये जमा केले आहेत.. आश्चर्य म्हणजे कोरोना काळात ही गेल्या 13 वर्षातील सर्वाधिक झालेली वाढ आहे.

2006 मध्ये सर्वाधिक म्हणजे 52 हजार 500 कोटी रूपयांचे डिपॉझिट्स स्वीस बँकेत असल्याची माहिती समोर आलेली, पण त्यानंतर 2011, 2013 आणि 2017 ही वर्ष वगळता या रक्कमेत घसरण झाली होती.

2019 मध्ये जे आकडे समोर आले होते, त्यानुसार स्वीस बँकेत भारतीयांचे 6 हजार 625 कोटी होते. मात्र आता त्यात जवळपास 3 पटींनी वाढ होऊन ही संपत्ती 20 हजार 700 कोटींवर गेली आहे.

समजून घ्या : कोरोना लसीवर मोदी सरकार का आकारतंय GST?

4. आता हा पैसा भारतात का परत येऊ शकत नाही हा प्रश्न साहजिकच तुम्हाला पडला असेल.

तर जसं आपण सुरूवातीला समजून घेतलं, की खातेदाराची गोपनियता राखणं हीच या स्वीस बँकेची USP म्हणजेच वैशिष्ट्य मानलं जातं. कुठल्याही परिस्थितीत या बँका खातेदाराची माहिती, पत्ता, नंबर जाहीर करत नाहीत. शिवाय अनेक VIP अकाऊंट्स हे तर फक्त नंबर्ड अकाऊंट्स म्हणजेच त्यावर नाव न ठेवता केवळ नंबरनेच ओळखलं जात असल्याने नावं समोर येणं मुश्किल आहे.

एखाद्या खातेदारावर मनी लाँड्रिगंसारखे फसवणुकीचे गुन्हे किंवा इतर कुठले गंभीर गुन्हे दाखल असतील आणि स्वीस कोर्टाने बँकेला आदेश दिला तरच खातेदाराची माहिती उघड केली जाते. त्यामुळेच स्वीस बँकेतून काळा पैसा परत आणणं कठीण आहे.

5. आता स्वीस बँक, काळा पैसा आणि थोडं पॉलिटिक्सही जाणून घेऊयात….

2011 मध्ये यूपीए सरकारने स्वीस बँकेत भारतीयांची किती संपत्ती आहे हे शोधण्यासाठी एका समितीची स्थापना केली. पण स्वीस बँकेत भारतीयांचा मोठ्या प्रमाणात काळा पैसा आहे, हा मुद्दा सगळ्यात पहिले उपस्थित केला तो भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी…2009 मध्ये जेव्हा लोकसभेच्या निवडणुका तोंडावर होत्या, तेव्हा तत्कालीन विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी यांनी यूपीए सरकारला घेरण्यासाठी हा मुद्दा पुढे केलेला.

2011 मध्ये योगगुरू बाबा रामदेव यांनीही यूपीए सरकारविरोधात याच मुद्द्यावरून आंदोलन केलेलं. पिऊन असो वा पीएम ज्याचा काळा पैसा बाहेर आहे, तो परत आलाच पाहिजे, असं त्यांनी वक्तव्य केलेलं.

इतकंच नाही तर 2012 मध्ये जेव्हा अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाची स्थापना केली तेव्हा तर अंबानी, बिर्ला, नरेश गोयल अशा नावांची यादीच वाचत यांचा काळा पैसा स्वीस बँकेत असल्याचा दावाही केलेला.

2014 च्या लोकसभा निवडणुकीतही स्वीस बँकेतील काळा पैशाचा मुद्दा खूप गाजला, पंतप्रधान मोदी सत्तेतही आले…पण काळा पैसा स्वीस बँकेत किती आहे, यापलिकडे कुठलीही माहिती समोर आलेली नाही. याच निवडणुकीवेळी नरेंद्र मोदी म्हणालेले की काळा पैसा भारतात आला तर प्रत्येक भारतीयाच्या खात्यात 15 लाख टाकता येऊ शकतात.

पण हा काळा पैसा किती भारतात परत आणला, याचा कोणताही डेटा मोदी सरकारकडून जाहीर करण्यात आलेला नाही.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT