संजय राऊतांनी उल्लेख केलेले फडणवीसांचे निकटवर्तीय अमोल काळे आहेत तरी कोण?
केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा मागे लागलेल्या संजय राऊतांनी बुधवारी जाहीर पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांवर आरोप केले. ज्यात माजी खासदार किरीट सोमय्या, भाजप नेते मोहीत कंबोज यांच्यासह विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही राऊतांनी निशाणा साधला. फडणवीसांच्या काळात ‘महाआयटी’मध्ये २५ हजार कोटींचा घोटाळा जाल्याचा आरोप राऊतांनी केला. याचसोबत मोहीत कंबोज हे फडणवीसांचे ब्ल्यू आइड बॉय असून […]
ADVERTISEMENT
केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा मागे लागलेल्या संजय राऊतांनी बुधवारी जाहीर पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांवर आरोप केले. ज्यात माजी खासदार किरीट सोमय्या, भाजप नेते मोहीत कंबोज यांच्यासह विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही राऊतांनी निशाणा साधला. फडणवीसांच्या काळात ‘महाआयटी’मध्ये २५ हजार कोटींचा घोटाळा जाल्याचा आरोप राऊतांनी केला.
ADVERTISEMENT
याचसोबत मोहीत कंबोज हे फडणवीसांचे ब्ल्यू आइड बॉय असून ते एकदिवस फडणवीसांना बुडवणार असल्याचं राऊत म्हणाले. याचवेळी बोलत असताना राऊतांनी फडणवीसांचे सहकारी अमोल काळे यांचाही उल्लेख केला.
संजय राऊत यांनी फ्रंटमॅन म्हणून नाव घेतलेले जितेंद्र नवलानी आहेत कोण?
हे वाचलं का?
काय म्हणाले होते संजय राऊत?
देवेंद्र फडणवीसांच्या काळात महाआयटीमध्ये २५ हजार कोटींचा घोटाळा झाला. कोण आहे अमोल काळे, त्याला कुठे लपवून ठेवलंयत हे सांगा. या सर्वांच्या अकाऊंटची माहिती, आर्थिक देवाण-घेवाण, निवीदा न काढता कोणाला कंत्राट मिळाली, हा पैसा कुठे-कुठे गेला याची माहिती मी दोन दिवसांत मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखा आणि ईडी कडे देणार आहे. माझ्याकडे ५ हजार कोटींचा हिशोब आलेला आहे, तो मी यंत्रणांना देणार आहे.
ADVERTISEMENT
कोण आहेत अमोल काळे?
ADVERTISEMENT
अमोल काळे हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. अमोल काळे आणि देवेंद्र फडणवीस हे लहानपणापासूनचे मित्र आहेत. नागपुरातील अभ्यंकर नगर परिसरात अमोल काळे यांचे दोन अलिशान बंगले आहेत. अमोल काळे यांचा कन्स्ट्रक्शन आणि आयटी क्षेत्रात मोठा व्यवसाय असल्याची माहिती समोर येते आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात अमोल काळे यांचं मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी नाव सुचवण्यात आलं होतं. अमोल काळे MCA मध्ये या उपाध्यक्ष पदावर निवडून आले होते.
भर पत्रकार परिषदेत जोडा काढत किरीट सोमय्या म्हणाले, संजय राऊत तुम्ही खुशाल….
याचसोबत देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारसीवरुन अमोल काळे यांची तिरुमला तिरुपती देवस्थानाच्या समितीवर विशेष आमंत्रित सदस्य म्हणून २०१९ साली नेमणूक करण्यात आली होती. मुंबई तक ने अमोल काळे यांच्या घरी जाऊन त्यांची प्रतिक्रीया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. परंतू राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतर अमोल काळे यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली असून अमोल काळे सहपरिवार मुंबईत असल्याचं कळतंय.
‘बाप-बेटे जेलमध्ये जाणार! कोठडीचे सॅनिटायझेशन सुरू’ संजय राऊत यांचं ट्विट चर्चेत
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT