Sharad Pawar Meeting: पवारांनी बोलवलेल्या बैठकीला शिवसेनेला का नव्हतं निमंत्रण?, पाहा राऊत काय म्हणाले
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress) अध्यक्ष सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आज (22 जून) भाजपविरोधी पक्षातील काही नेत्यांची बैठक पार पडली. पण या बैठकीसाठी शिवसेनेला (Shiv Sena) आमंत्रण देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे राजकीय वर्तुळात मात्र उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान, याबाबत शिवसेना नेते संजय राऊत (Shiv Sena leader Sanjay Raut) यांनी […]
ADVERTISEMENT
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress) अध्यक्ष सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आज (22 जून) भाजपविरोधी पक्षातील काही नेत्यांची बैठक पार पडली. पण या बैठकीसाठी शिवसेनेला (Shiv Sena) आमंत्रण देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे राजकीय वर्तुळात मात्र उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.
ADVERTISEMENT
दरम्यान, याबाबत शिवसेना नेते संजय राऊत (Shiv Sena leader Sanjay Raut) यांनी या प्रश्नाचं उत्तर देऊ सुरु असलेल्या चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
पाहा संजय राऊत नेमकं काय म्हणाले:
हे वाचलं का?
‘शरद पवारांनी जी बैठक बोलवली आहे ही यशवंत सिन्हा यांच्या राष्ट्र मंचची आहे. त्यामुळे ही बैठक काही विरोधी पक्षाची बैठक नाही. त्यामुळे त्या बैठकीला शिवसेनेने जाण्याचा काहीही प्रश्नच उद्भवत नाही.’
‘देशात एका प्रबळ विरोधी पक्षासाठी कुणी प्रयत्न करत असेल तर त्यात चूक काय. ही भाजपाविरोधी किंवा यूपीएविरोधी बैठक आहे असं कुणीही म्हटलेलं नाही. सध्या शिवसेना आणि शरद पवार एकत्र आहे. काँग्रेस आणि शिवसेनेशिवाय तिसरी आघाडी होऊ शकत नाही.’
ADVERTISEMENT
मोदींविरोधात शरद पवारांची Powerful खेळी, भाजपविरोधी पक्षांची आज दिल्लीत बैठक
ADVERTISEMENT
‘काल माझं शरद पवार यांच्याशी फोनवर बोलणं झालं. आजची बैठक ही यशवंत सिन्हा यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रमंचची आहे. त्यांचे काही मुद्दे आहेत. त्यावर तिथे चर्चा केली जाणार आहे.’
‘ही जी बैठक आहे ती काही देशातील विरोधी पक्षांची बैठक नाही. या बैठकीमुळे एक होऊ शकतं की, देशातील मजबूत विरोधी पक्ष स्थापन करण्याची पहिली पायरी ठरु शकते. देशाला सध्या मजबूत विरोधी पक्षाची गरज आहे. विरोधी पक्ष प्रबळ असणं हे खूप आवश्यक आहे. सध्या पवार तेच करत आहेत.’ असं म्हणत संजय राऊत यांनी ही बैठक काही महत्त्वाच्या विरोधी पक्षांची नसल्याचं म्हटलं आहे.
2024 मध्ये मोदींना आणि पर्यायाने भाजपला रोखायचं असेल तर सर्व विरोधकांनी एकत्र येणं आवश्यक आहे. विरोधक विखुरलेले असतील तर भाजपचं यश सोपं होईल.
महाराष्ट्रात झालेला महाविकास आघाडीचा प्रयोग हा शरद पवारांनी यशस्वी करून दाखवला. बेरजेचं गणित ही त्यांच्या राजकारणाची शैली आहे. अशात आता राष्ट्रीय पातळीवर शरद पवार हे सगळ्या भाजप विरोधी पक्षांना एकत्र आणतील का? ती मोट बांधण्यात यशस्वी होतील का? हे पाहणं नक्कीच औत्सुक्याचं असणार आहे.
Sharad Pawar आणि Prashant Kishor यांच्यात बंद दाराआड चर्चा, राजधानी दिल्लीत घडामोडींना वेग
या बैठकीला यशवंत सिन्हा, पवन वर्मा, संजय सिंग, डी राजा, फारुख अब्दुल्ला, माजिद मेमन, संजय झा, सुधींद्र कुलकर्णी, खासदार वंदना चव्हाण, आशुषतोष , के.सी. सिंग, अर्थतज्ज्ञ अरूण कुमार, प्रीतीश नंदी या सगळ्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र यावेळी शिवसेनेला या बैठकीपासून दूर ठेवण्यात आलं होतं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT