महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणणार ! होम पीचवरुन फडणवीसांचं पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांना आव्हान
गोवा विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या अभुतपूर्व यशानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं राज्याच्या राजकारणातलं वजन चांगलंच वाढलं आहे. नागपूरमध्ये नितीन गडकरींच्या हस्ते देवेंद्र फडणवीसांचा खास सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित कार्यक्रमात गडकरी आणि फडणवीस या दोन्ही नेत्यांनी आगामी काळात महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या सत्कार सोहळ्यात […]
ADVERTISEMENT
गोवा विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या अभुतपूर्व यशानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं राज्याच्या राजकारणातलं वजन चांगलंच वाढलं आहे. नागपूरमध्ये नितीन गडकरींच्या हस्ते देवेंद्र फडणवीसांचा खास सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित कार्यक्रमात गडकरी आणि फडणवीस या दोन्ही नेत्यांनी आगामी काळात महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला आहे.
ADVERTISEMENT
देवेंद्र फडणवीसांच्या सत्कार सोहळ्यात बोलत असताना नितीन गडकरी यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांवर निशाणा साधला. “गोव्यामध्ये राष्ट्रवादी व शिवसेनेने भाजपला हरवण्यासाठी कंबर कसली होती. रोज वर्तमानपत्राला मुलाखत देत भाजपच्या पराभवासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. मात्रा, गोव्याच्या जनतेने त्यांना नाकारले. जात, धर्म, पंथाच्या पलीकडे जाऊन गोव्याच्या जनतेने विकासाला मते दिली. त्यामुळे आता महाराष्ट्रातही भाजपचाच भगवा फडकणार आहे. आगामी महापालिकेवरही भगवा फडकवण्याचा संकल्प करा”, असं गडकरी म्हणाले.
२०२४ निवडणुकीचे निकाल जवळपास निश्चीत; मोदींना आव्हान देताना विरोधक कुठे चुकतायत?
हे वाचलं का?
चार राज्यातील जनतेने जात, धर्म, पंथ आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन केवळ विकासाला मते दिली. भाजपला मिळालेल्या या यशानंतर विरोधक आता घाबरले आहेत. पाचही राज्यातील निवडणुका भाजपला कठीण जातील, अशी चर्चा सुरू होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असलेला जनतेचा विश्वास पुन्हा एकदा सार्थ ठरला. गोव्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आजपर्यंत मिळाले नाही असे अभूतपूर्व यश भाजपला मिळाले आहे. लोकांना आता जातीवादाचे राजकारण नको, हे मतदारांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. आता शहरात महापालिका निवडणुका होऊ घातल्या आहे. शहराच्या विकासात देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांचे योगदान आहे. शहरातील विकासकामांमुळे आपल्याला शक्ती मिळाली आहे. गोव्यात फडणवीस यांच्या नेतृत्वात जसे यश मिळाले तसेच आगमी महापालिकेत मिळवण्यासाठी सर्वानी संकल्प करावा, असं आवाहनही गडकरी यांनी केलं.
भाजपला खरोखरच महिला मतदारांमुळे ऐतिहासिक विजय मिळाला?
ADVERTISEMENT
यावेळी उपस्थित कार्यकर्ते आणि गडकरींचे आभार मानताना देवेंद्र फडणवीसांनीही शिवसेनेला टोला लगावण्याची संधी सोडली नाही. गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी आपले नशीब आजमावयला आले होते. पण, गोव्याच्या मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखविली. शिवसेना, राष्ट्रवादीचे हे मुंगेरीलाल के हसीन स्वप्न होते. ‘गोवा तो झाकी थी, महाराष्ट्र अभी बाकी है’, असा निर्धार करत महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणणार असल्याचा विश्वास फडणवीसांनी यावेळी व्यक्त केला.
ADVERTISEMENT
मतदारांनी भाजपलाच मतदान का केलं; भाजपच्या मतदाराला कसं आकर्षित करता येईल?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT