मुकेश अंबानींना मागे टाकून गौतम अदानी होणार सर्वात श्रीमंत भारतीय व्यावसायिक?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुकेश धीरूभाई अंबानी आणि गौतम शांतीलाल अदानी या दोघांची गणना भारतातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांमध्ये होते. हे दोघेही आज घडीला अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. मुकेश अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक आहेत. तसंच भारतातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांमध्ये त्यांची गणना होते. दीर्घकाळापासून आशियातील श्रीमंत व्यावसायिक असा त्यांचा लौकिक आहे. मात्र आता गौतम अदानी हे दुसऱ्या स्थानावर पोहचले आहेत. लवकरच ते मुकेश अंबानींना मागे टाकून पहिलं स्थान पटकवतील अशी चर्चा आता रंगते आहे. याचं कारणही तितकंच महत्त्वाचं आहे. चीनमधले उद्योजक झोंग शानशान यांना गौतम अदानींनी मागे टाकून दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत आता गौतम अदानी हे नाव दुसरं आहे.

ADVERTISEMENT

मुकेश अंबानी आणि गौतम अदानी या दोघांच्या संपत्तीत फक्त 8.7 बिलियन डॉलर्सचा फरक आहे. त्यामुळे ही चर्चा आता व्यवसाय क्षेत्रात चांगलीच रंगली आहे. एवढंच नाही तर जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या स्थानी मुकेश अंबानी हे 13 व्या स्थानी आहेत आणि त्यांच्या पाठोपाठ 14 व्या स्थानावर गौतम अदानी यांनी झेप घेतली आहे. त्यामुळे आता गौतम अदानी हे आता पहिल्या स्थानावर येण्यास तयार आहेत हे जवळपास निश्चित झालं आहे असं म्हटल्यास मुळीच वावगं ठरणार नाही.

Bloomberg Billionaires index नुसार सोमवारी रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स पडले. त्यामुळे मुकेश अंबानी यांना नेटवर्थ 55.4 कोटी डॉलर्सनी कमी होऊन 76.5 अरब डॉलर झाली. दुसरीकडे अदानी ग्रुपच्या दोन कंपन्यांना शेअर्समध्ये सोमवारी तेजी पाहण्यास मिळाली त्यामुळे अदानी यांना 1.28 अरब डॉलर्सने वाढून 70.2 अरब डॉलर्स पर्यंत पोहचली. त्यामुळे आता या दोघांच्याही नेटवर्थमध्ये 8.7 बिलियन डॉलर्सचा फरक राहिला आहे.

हे वाचलं का?

अदानी ग्रुपच्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्या शेअर्समध्ये यावर्षी उसळी पाहण्यास मिळाली आहे. त्यामुळे यावर्षी अदानी यांच्या नेटवर्थमध्ये 36.5 अरब डॉलर्सची भर पडली आहे. याचाच अर्थ त्यांच्या एकूण नेटवर्थच्या अर्ध्याहून जास्त कमाई यावर्षी झाली आहे. अदानी हे यावर्षी फ्रान्सच्या बर्नार्ड आरनॉल्ट यांना वगळता बाकी सगळ्या श्रीमंतांना कमाईच्या बाबतीत सरस ठरले आहेत.

अदानी समूहातील जवळपास सर्वच लिस्टेट कंपन्यांचे बाजारमूल्य चालू वर्षात थेट 50 टक्क्यांपर्यंत झेपावले आहे. समूह वीज, खनिजकर्म, वायू, बंदर, विमानतळ अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहे. अदानी समूहाने गेल्या वर्षी 2020 मध्ये मालमत्तेतील तब्बल 500 टक्क्यांहून जास्त वाढ नोंदवली होती. पैकी सर्वाधिक 18 अब्ज डॉलर मालमत्ता अदानी ग्रीन एनर्जी कंपनीची आहे. अदानी टोटल गॅसचे मूल्य सर्वाधिक, 97 टक्क्यांनी वाढले आहे. तर मुख्य प्रवर्तक अदानी एंटरप्राइजेस 87 टक्क्यांनी वाढला. अदानी एनर्जी ग्रीनचे मूल्य तूर्त 10 टक्क्यांनी वाढले आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT