Crime : प्रियकरासोबत नवीन आयुष्याची सुरुवात करण्यापूर्वी केला शेवटचा गुन्हा अन्…
मुंबई (शिवशंकर तिवारी) : प्रियकरासोबत आयुष्याची नवीन सुरुवात करण्यापूर्वी शेवटचा गुन्हा करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. शलाका सुरेश गवस आणि तिच्या प्रियकराला बोरिवली रेल्वे स्टेशन पोलिसांनी गोव्यातील रेस्टॉरंटमध्ये फसवणुकीच्या गुन्ह्यात बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान संबंधित महिलेवर यापूर्वीही महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यात फसवणुकीचे डझनभर गुन्हे दाखल असल्याचं समोर आलं आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल […]
ADVERTISEMENT
मुंबई (शिवशंकर तिवारी) : प्रियकरासोबत आयुष्याची नवीन सुरुवात करण्यापूर्वी शेवटचा गुन्हा करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. शलाका सुरेश गवस आणि तिच्या प्रियकराला बोरिवली रेल्वे स्टेशन पोलिसांनी गोव्यातील रेस्टॉरंटमध्ये फसवणुकीच्या गुन्ह्यात बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान संबंधित महिलेवर यापूर्वीही महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यात फसवणुकीचे डझनभर गुन्हे दाखल असल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, शलाका सुरेश गवस (३५) आणि तिच्या गोव्यातील प्रियकराने लग्नाचा निर्णय घेतला होता. आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी आपण नवीन व्यवसाय सुरू करू असा विचारही या दोघांनीही केला. मात्र, यासाठी त्या दोघांनाही पैशांची गरज होती.
या प्रकरणातील तक्रारदार महिला नोकरीच्या शोधात असताना आरोपी शलाका गवसने २०२२ मध्ये त्यांना मालाड स्टेशनवर भेटण्यासाठी बोलावलं. शलाकाने तक्रारदार महिलेला सांगितलं की, तुला नोकरी मिळू शकते, पण त्यापूर्वी एक कॅमेरा आवश्यक आहे. तक्रारदार महिलेने नोकरीसाठी शलाकाला पवई येथून कॅनन कंपनीचा कॅमेरा भाड्याने आणून दिला. या कॅमेराची किंमत तब्बल दीड लाख रुपयांपर्यंत होती.
हे वाचलं का?
दुसऱ्या दिवशी दोघीही मालाड स्थानकात भेटल्या आणि तक्रारदार महिलेने आरोपी शलाकाला कॅमेरा दिला. आरोपी शलाका तक्रारदार महिलेला दुसऱ्या दिवशी भेटू असे सांगून निघून गेली. दुसऱ्या दिवशी जेव्हा तक्रारदार महिला मालाड स्टेशनवर आली आणि आरोपी शलाकाला फोन केला तेव्हा तिचा नंबर बंद लागला. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच महिला तक्रार देण्यासाठी बोरिवली रेल्वे स्टेशन पोलीस स्थानकात पोहचली.
संबंधित महिलेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल कदम यांच्या नेतृत्वात एका पथकाची स्थापना करून प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला. तपास करत असताना पोलिसांनी गोव्यातील एका रेस्टॉरंटमधून महिलेला अटक करून कॅमेरा जप्त केला. या तपासात संबंधित आरोपी महिला मागील अनेक दिवसांपासून अशी फसवणूक करत असल्याचं निष्पन्न झालं. या महिलेवर मुंबई महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यात डझनभर गुन्हे दाखल आहेत, अशीही माहिती पोलिसांनी दिली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT