आधीच गर्भवती असलेल्या महिलेला 5 दिवसांनी पुन्हा नवी गर्भधारणा, डॉक्टरही अचंबित

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कॅलिफोर्निया: एका महिलेसोबत एक असा काही प्रकार घडला आहे की, ज्याबाबत माहित पडल्यानंतर आपल्यालाही आश्चर्याचा प्रचंड धक्का बसेल. कॅलिफोर्नियामध्ये राहणाऱ्या ओडालिस मार्टिनेझसोबत असे काही घडले की, ज्याचा तिने कधी विचारही केला नव्हता. वास्तविक, ओडालिस हिला 5 दिवसात दोनदा गर्भधारणा झाली आहे. 25 वर्षीय ओडालिसच्या म्हणण्यानुसार, ती तिच्या पहिल्या गर्भधारणेची योजना आखत होती. परंतु तिला समजले की तिला दुसरी गर्भधारणा देखील झाली आहे. जाणून घ्या हे संपूर्ण प्रकरण आहे तरी काय:

ADVERTISEMENT

ओडालिसने सांगितले की, ती आधीच गरोदर असताना पुन्हा एकदा गर्भवती झाली. अशा परिस्थितीत तिला दोन गर्भधारणा झाली पण ही जुळी मुले नव्हती. तर दोघांमध्ये 5 दिवसांचे अंतर होते.

2020 मध्ये, कॅलिफोर्नियातील सॅन पाब्लो येथे राहणारे ओडालिस आणि अँटोनियो मार्टिनेझ यांना गर्भधारणेच्या बातमीने खूप आनंद झाला होता. कारण काही महिन्यांपूर्वीच तिचा गर्भपात झाला होता. अशा परिस्थितीत ही नवीन गर्भधारणा तिच्यासाठी खूप खास होती.

हे वाचलं का?

गरोदरपणात जेव्हा ओडालिसचे पहिले स्कॅन झाले तेव्हा तिला कळले की तिला दोन मुले होणार आहेत. ज्यांची गर्भधारणा एकाच आठवड्यात परंतु वेगवेगळ्या दिवशी झाली. खरं म्हणजे या दुर्मिळ घटनेला सुपरफेटेशन म्हणून ओळखले जाते. जेव्हा गर्भधारणेदरम्यान स्त्री पुन्हा गर्भवती होते तेव्हा असे होते. आणि हे पहिल्या गर्भधारणेनंतर काही दिवस किंवा आठवड्यामध्ये देखील होऊ शकते.

ओडालिसने सांगितले की, आमच्यासाठी हे एखाद्या जादूपेक्षा कमी नव्हतं. त्यांनी त्यांच्या दोन मुलींची नावे लिलो आणि इमेल्डा ठेवली आहेत. ओडालिसने सांगितले की, त्यांच्या दोन्ही मुलींची चेहरेपट्टी खूपच सारखी आहे आणि आम्ही अनेकदा आमचाही दोघींमध्ये गोंधळ होतो. ओडालिस म्हणाली, दोघीही अगदी सारख्याच दिसतात. त्यामुळे लोकांना सत्य सांगण्याऐवजी आम्ही त्यांना सांगतो की त्या दोघीही जुळ्याच आहेत.

ADVERTISEMENT

ओडालिस म्हणाली, ‘मी आधीच गरोदर असतानाच मी पुन्हा एकदा गरोदर राहिली. आधी मलाही वाटायचं की मी जुळ्या मुलांना जन्म देतेय पण नंतर अनेक लेख वाचून लक्षात आलं की ते तांत्रिकदृष्ट्या जुळे नाहीत. पण जेव्हा आपण लोकांना याबद्दल सांगतो तेव्हा ते खूप गोंधळतात, म्हणून आम्ही त्यांना सत्य सांगत नाही.’

ADVERTISEMENT

ओडालिस असंही म्हणाली की, ‘त्यांच्या दोन मुली तांत्रिक किंवा वैचारिकदृष्ट्या जुळ्या नाहीत, परंतु त्यांचे चेहरे एकमेकांसारखे आहेत.’ ओडालिस आणि अँटोनियो दोघेही समुपदेशक आहेत आणि दोघांनी 2020 च्या सुरुवातीला लग्न केले होते, त्यानंतर ते कुटुंब नियोजन करण्याचा विचार करत होते. मात्र यादरम्यान, त्यांना गर्भपाताला सामोरं जावं लागलं.

धक्कादायक… चुकीचे सोनोग्राफी निदान केल्याने गर्भवती महिलेसह बालकाचा मृत्यू, डॉक्टरविरोधात गुन्हा

सुपरफेटेशन काय आहे?

सुपरफेटेशन ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये गर्भधारणेमध्ये एक भ्रूण असला तरीही नवीन गर्भ तयार होतो. या परिस्थितीत आधीच गर्भवती असलेली स्त्री पुन्हा गर्भधारणा करू शकते. ही अत्यंत दुर्मिळ परिस्थिती आहे. अशी फार कमी प्रकरणे समोर येतात. सहसा, जेव्हा एखादी स्त्री गर्भवती असते तेव्हा त्याच वेळी दुसरी गर्भधारणा होत नाही.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT