ऐकावं ते नवलच ! यवतमाळच्या शेतकऱ्याने कागदावर बनवला चहा
चहा आवडत नाही असा व्यक्ती आपल्याला क्वचितच सापडेल. भारतातल्या प्रत्येक शहरात कोपऱ्या-कोपऱ्यावर आपल्याला चहाची दुकानं मिळतील. अनेकदा चहाची तलफ आली की आपण काहीना काही जुगाड करुन चहा पिताना पाहिलं आहे. यवतमाळमधल्या एका शेतकऱ्याने चहा पिण्यासाठी लढवलेली शक्कल सध्या चर्चेचा विषय ठरते आहे. यवतमाळमधील अब्बास भाटी या तरुण शेतकऱ्याने चक्का कागदावर चहा उकळत ठेवून त्याचा आस्वाद […]
ADVERTISEMENT
चहा आवडत नाही असा व्यक्ती आपल्याला क्वचितच सापडेल. भारतातल्या प्रत्येक शहरात कोपऱ्या-कोपऱ्यावर आपल्याला चहाची दुकानं मिळतील. अनेकदा चहाची तलफ आली की आपण काहीना काही जुगाड करुन चहा पिताना पाहिलं आहे. यवतमाळमधल्या एका शेतकऱ्याने चहा पिण्यासाठी लढवलेली शक्कल सध्या चर्चेचा विषय ठरते आहे.
ADVERTISEMENT
यवतमाळमधील अब्बास भाटी या तरुण शेतकऱ्याने चक्का कागदावर चहा उकळत ठेवून त्याचा आस्वाद घेतला. अब्बास शेतात रात्री जागरणासाठी आला असताना त्याला चहा पिण्याची तलफ आली. परंतू शेतात त्यावेळी चहा बनवण्यासाठी कोणतंही साधन नसल्यामुळे चहा बनवायचा तरी कसा असा प्रश्न अब्बास पुढे पडला होता. अखेरीस त्याने कागदावर चहा बनवण्याचं ठरवलं.
हे वाचलं का?
आर्णी तालुक्यात आपल्या शेतावर अब्बास यांनी विटांची चुल, काडीचा विस्तव आणि कागदाचा गंज करून तयार चहा तयार केला. आगीजवळ कागद नेला तर क्षणात जळुन खाक होतो. त्यामुळे अब्बास यांनी आग अत्यंत हळु आचेवर राहिल याची काळजी घेत पाणी, दुध, चहा पावडर, साखर, वेलची टाकत चहा तयार केला. या अनोख्या युक्तीची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT