Mumbai Tak /बातम्या / Meghalaya : ‘मविआ’ पार्ट – २ सपशेल फसला; सर्वात मोठ्या पक्षासोबत काय घडलं?
बातम्या राजकीय आखाडा

Meghalaya : ‘मविआ’ पार्ट – २ सपशेल फसला; सर्वात मोठ्या पक्षासोबत काय घडलं?

Meghalaya government formation: मेघालयमध्ये (Meghalaya) महाराष्ट्राच्या (Maharashtra) पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे. सत्तास्थापनेसाठी २६ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या एनपीपीला बाजूला सारून वेगळी राजकीय आघाडी करण्याचा प्रयत्न होता. मात्र ३ दिवसांत घडलेल्या अत्यंत नाट्यमय घडामोडींनंतर अखेर काल (रविवारी) युनायटेड डेमोक्रॅटिक पक्ष (UDP) आणि पीपल्स डेमोक्रॅटिक फ्रंट (PDF) या पक्षांनी कोनराड संगमा यांच्या एनपीपी पक्षासोबत युती करत सरकारला पाठिंबा दिला आहे. या दोन्ही पक्षांनी आपल्या समर्थनाचे पत्र कोनराड संगमा यांच्याकडे सुपूर्द केले. (The UDP and the PDF are allies of the NPP in the outgoing Meghalaya Democratic Alliance (MDA) government)

यानंतर कोनराड संगमा यांनी ट्विट करत सांगितलं की, “युडीपी आणि पीडीएफ या पक्षांनी सरकार स्थापनेसाठी एनपीपीला दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार. राज्यातीलच दोन महत्त्वाच्या पक्षांची साथ मिळाल्यामुळे आता मेघालय आणि मेघालयच्या जनतेसाठी आम्हाला ठोस असे काम करणे शक्य होणार आहे.”

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मेघालयमध्ये एकाही पक्षाला बहुमत मिळालेलं नाही. निकालात संगमा यांच्या एनपीपीला सर्वाधिक २६ जागा मिळाल्या. तर युडीपीला दोन नंबरच्या म्हणजे ११ जागा मिळाल्या. निकालानंतर अवघ्या काही तासांतच २ आमदार असलेल्या भाजपने एनपीपीला आपले समर्थन देऊ केले. दुसऱ्याच दिवशी एनपीपी आणखी दोन अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळाला. तसेच हिल स्टेट पिपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या दोन आमदारांनीही त्यांना पाठिंबा दिला. त्यामुळे एनपीपीकडे ३२ आमदारांचं संख्याबळ झालं होतं. बहुमतासाठी ३१ आमदारांची गरज होती.

Rabri Devi: माजी सीएमच्या घरी सीबीआय पथक; ‘या’ घोटाळ्याप्रकरणी चौकशी

मात्र, हिल स्टेट पिपल्स डेमोक्रॅटिक पक्षाने अचानक घुमजाव करत दोन आमदारांनी एनपीपीला दिलेला पाठिंबा अधिकृत नसल्याचे जाहीर केलं. यामागे युडीपीचे तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्न सुरु असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली. एनपीपी आणि भाजपाविरोधी पक्षांना एकत्र करून ही एक नवी युती तयार करण्याचा प्रयत्न होता. शनिवारपर्यंत युडीपीचे तृणमूल काँग्रेस आणि इतर पक्षांना सोबत घेऊन तिसरी आघाडी स्थापन करून सरकार स्थापन करण्याची आखणी सुरु होती. सत्तास्थापनेसाठीचे संख्याबळ आमच्याकडेच आहे, असे दावे युडीपीकडून केले जाऊ लागले.

नाव हटवलं आता औरंगजेबाची कबरही जाणार? शिवसेनेची मोदींकडे मोठी मागणी

मात्र रविवारी अचानक युडीपीने एनपीपीला पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर आता एनपीपीकडे आता ६० सदस्यांच्या सभागृहात तब्बल ४५ आमदारांचे भक्कम असे संख्याबळ असून कोनराड संगमा दुसऱ्यांदा सरकार स्थापनेसाठी सज्ज झाले आहेत. संगमा मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा मंगळवारी राजभवन येथे होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे या सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

---------
Bollywood: वय 50च्या पुढे पण आजही दिसतात पंचवीशीतल्या, पाहा कोण आहेत ‘या’ अभिनेत्री IPL 2023 : 12 क्रिकेटपटू खेळू शकणार नाही सुरूवातीचे सामने, पहा कोण आहेत ते? मुकेश अंबानींचा दुबईतील बंगला पाहिला का?, किंमत ऐकून व्हाल हैराण! IPL : एमएस धोनी याबाबतीत सर्वात पुढे, रोहित-विराट खूपच मागे ‘मला बाथरूममध्ये नेत…’, शिव ठाकरेने सांगितला कास्टिंग काऊचचा भयंकर अनुभव पोलीसाने भर रस्त्यात गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, पुढे काय घडलं? Video व्हायरल Akanksha Dubey: अभिनेत्री आकांक्षाचा मृत्यू कसा झाला? पोस्टमॉर्टेम रिर्पोटमध्ये कळलं कारण अनुष्का शर्माचे टॅक्स प्रकरण काय? विक्रीकर विभागाचे म्हणणे काय? रस्त्यावर दगडं, गाड्यांची राखरांगोळी, छत्रपती संभाजीनगरातील ही दृश्ये बघितली का? WPL लाइव्ह मॅचमध्ये टीम इंडियाच्या ‘या’ स्टार खेळाडूंनी धरला ठेका, Video व्हायरल! Facebook-Instagram वर ब्लू टिक हवीये? भारतीयांसाठी असे आहेत प्लान Ayodhya: अयोध्येतील यंदाची रामनवमी आहे विशेष, भाविकांचा लोटला जनसागर सुहाना खान अमिताभच्या नातवाला करतेय डेट? Samantha Ruth Prabhu: कुटुंबीयांनी विरोध केला, पण मी…, सामंथाने सोडलं मौन रस्त्यावर विकले जाणारे ‘हे’ पदार्थ मुकेश अंबानींच्या फार आवडीचे! 15व्या वर्षी राहिलेली गरोदर… मुलीने सांगितली इमोशनल स्टोरी! 2 मुलांची आई, वय 40 पेक्षा जास्त; तरीही ‘या’ अभिनेत्री… एकाच वेळी घेतला तीन मुलींनी जन्म, रचला ‘हा’ विक्रम बिकनीत फोटो शेअर करण पडलं महागात, तरूणीला लाखोंचे नुकसान भारतातील हे राज्य चक्क झाडांना देते पेन्शन, नाव आहे प्राण वायू देवता योजना