Survey: वयाच्या 83व्या वर्षी शरद पवार NCP मध्ये चमत्कार घडवतील? लोकांचा हैराण करणारा कौल
शरद पवारांच्या या सभेपुर्वीच अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. कारण एबीपीचा सी वोटर सर्वे आला आहे. या सर्वेत शरद पवारांच्या बाजूने मते पडली आहेत.तर अजित पवार यांना फारसा असा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत नाही आहे.
ADVERTISEMENT
ABP CVoter Survey : राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी जाहिर सभेत शरद पवारांचं (Sharad Pawar) वय काढत त्यांना निवृत्तीचा सल्ला दिला होता.या सल्यानंतर शरद पवार यांनी वयाच्या 83 व्या वर्षी देखील पक्षाचा मीच आश्वासक चेहरा असल्याचे विधान करत संपूर्ण महाराष्ट्रात सभा घेण्याची घोषणा केली होती. ही घोषणा करून शरद पवार यांनी थेट अजित पवारांनाच आव्हान दिले आहे. मात्र शरद पवारांच्या या सभेपुर्वीच अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. कारण एबीपीचा सी वोटर सर्वे आला आहे. या सर्वेत शरद पवारांच्या बाजूने मते पडली आहेत.तर अजित पवार यांना फारसा असा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत नाही आहे. (abp cvoter survey will sharad pawar agin form ncp in maharashtra at the age of 83 maharashtra politics)
ADVERTISEMENT
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर एबीपीने सी वोटर सर्वे केला होता. शरद पवार सभा घेऊन महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष उभा करू शकतात का? वयाच्या 83 व्या वर्षी हे शक्य आहे का? असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला एबीपीच्या सी वोटर सर्वेत विचारण्यात आला होता.या सर्वेत शरद पवार यांच्या बाजूने निकाल लागला आहे. तर अजित पवार यांना राष्ट्रवादीतील बंडखोरीचा फटका बसेल अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.
हे ही वाचा : Exclusive: ‘अजितला तीनदा उपमुख्यमंत्री केलं, पण सुप्रियाला…’, शरद पवार अखेर मनातलं बोललेच!
शरद पवार सभा घेऊन महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष उभा करू शकतात का? वयाच्या 83 व्या वर्षी हे शक्य आहे का? असा प्रश्न एबीपीच्या सी वोटर सर्वेत विचारण्यात आला होता. या प्रश्नाला शरद पवार यांच्या बाजूने 57 टक्के मत पडली आहेत. 37 टक्के नागरीकांनी नाही असे मत नोंदवले आहे. आणि उरलेल्या 6 टक्के लोकांनी माहित नाही असे म्हटले आहे.हा निकाल पाहता शरद पवार पुन्हा महाराष्ट्रात पक्ष उभा करू शकतात, असे सर्वेतून तरी स्पष्ट होतेय.
हे वाचलं का?
शरद पवार NCP पक्षाला उभं करू शकतात?
हा : 57 टक्के
नाही : 37 टक्के
माहित नाही : 6 टक्के
राष्ट्रवादीचा अजित पवार गट पक्ष, चिन्ह आणि राष्ट्रीय अध्यक्ष पदावर दावा सांगत असली तरी एबीपी सी वोटर सर्वेनुसार 57 टक्के महाराष्ट्राची जनता ही शरद पवार यांच्या बाजूने असल्याचे स्पष्ट होते आहे. आणि या जनतेला शरद पवार पुन्हा पक्ष उभारतील असा विश्वास देखील आहे. त्यामुळे अजित पवारांसाठी हा मोठा धोका मानला जात आहे. जरी सर्वेतून या गोष्टी स्पष्ट होत असल्या तरी खरी राष्ट्रवादी कोणाची हे येणाऱ्या काळात कळणार आहे.
हे ही वाचा : Inside Story: शरद पवारांना दाखवला कात्रजचा घाट, अजितदादांनी 30 जूनलाच कसा साधला डाव?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT