अशोक चव्हाण, अजित पवारांवर असदुद्दीन ओवेसी बरसले; म्हणाले, "मोदींच्या पायाजवळ बसून..."
Asaduddin owaisi akola speech :
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अशोक चव्हाणांना असदुद्दीन ओवैसींचा सवाल
अजित पवारांवरही साधला निशाणा
असदुद्दीन ओवैसींचे अकोल्यात भाषण
Asaduddin Owaisi Ashok chavan Ajit Pawar : अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी भाजपसोबत घरोबा केला. मुंबईतील काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी हेही अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करत भाजपसोबत गेले. या घटनांचा उल्लेख करत एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी बी टीम आरोप करणाऱ्यांचा समाचार घेतला.
अकोला येथे झालेल्या सभेत बोलताना असदुद्दीन ओवेसी म्हणाले, "माझ्या भावानो फक्त मत देणारे बनू नका. बकरी सारखं जगू नका. वाघासारखं जगा. तुम्ही कधीपर्यंत शेळ्यासारखं चालत राहणार. तुम्ही असदुद्दीन ओवैसींपेक्षा चांगले नेता बनू शकतात, फक्त हिंमत निर्माण करा."
एमआयएमचे चार खासदार जिंकून द्या
"येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून तीन चार खासदार जिंकून देणार का? हे ठरवा. महाराष्ट्रातून चार खासदार जिंकून देणार का? जोरात बोला... शिंदेंना माहिती व्हायला हवं. फडणवीसांना कळायला हवं. शरद पवारांना कळायला हवं, अमित शाहांना आणि मोदींना कळायला हवं की, महाराष्ट्रातून एमआयएमचे चार खासदार निवडून येत आहेत", असे आवाहन ओवेसींनी केले.
"अशोकराव (अशोक चव्हाण), जे मला शिव्या द्यायचे... त्यांचे चमचे मला शिव्या द्यायचे... आज मोदींच्या पायाजवळ बसून गपागप चहा पित आहेत. कालपर्यंत बी टीम... बी टीम बोलणारे आज स्वतःच मोदींच्या जवळ जाऊन राज्यसभेचं सदस्यत्व अशोकराव घेत आहेत", अशा शब्दात ओवेसींनी अशोक चव्हाणांना सुनावले.
