अयोध्या मंदिर आणि हिंदुत्वाबद्दल भाजपचे युवा नेते अनूप चौधरींचं रोखठोक वक्तव्य

मुंबई तक

ADVERTISEMENT

ayodhya temple is 80 percent ready bjp youth leader anoop chaudhary statement
ayodhya temple is 80 percent ready bjp youth leader anoop chaudhary statement
social share
google news

Anoop Chaudhary on Ayodhya temple : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली तयार होत असलेले अयोध्या मंदिर (Ayodhya temple) 80 टक्के बनून तयार झाले आहे. तसेच या मंदिरासोबत संपूर्ण अयोध्येचा विकास होत असल्याची माहिती भाजपचे युवा नेते, केंद्रातील अनेक मंत्रालयाचे सल्लागार अनूप चौधरी (Anoop Chaudhary) यांनी मुंबई तकच्या बैठकीत (Mumbai Tak Baithak) दिली आहे. अनूप चौधरी यांनी दिलेल्या या माहितीनंतर रामभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. (ayodhya temple is 80 percent ready bjp youth leader anoop chaudhary statement on mumbai tak baithak)

ADVERTISEMENT

मागचे सरकार नेहमी अयोध्येला मुद्दा वगळण्याचे काम करायची.तसेच त्याच्या पक्षात सनातन धर्माचे नेते घाबरून भगवान रामाचे नाव देखील घ्यायचे नाहीत. राम राम बोलल्याने त्यांचे प्रमोशन ऐवजी डिमोशन होईल अशी भिती त्यांना असायची, अशी टीका अनूप चौधरी यांनी कॉंग्रेस नेत्यांवर केली. तसेच याआधी रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी सुरक्षेचा दृष्टीने अनेक गोष्टींचा सामना करावा लागायचा. रामभक्तांसाठी खुप बॅरीगेटींग असायच्या, मात्र आता परीस्थिती बदलली आहे. रामभक्तांना रामलल्लांचे सहज दर्शन होतेय,अशी माहिती अनूप चौधरी (Anoop Chaudhary) यांनी दिली.

समाजवादी पार्टी परीवारवादाच, समाजात फुट पाडण्याचे राजकारण करते. मात्र भाजप राष्ट्रवादच्या गोष्टी करते, देशाला मजबूत करण्यासह तरूणांना आत्मनिर्भर करण्याचे काम करते. सबका साथ सबका विकास सबका विश्वासची गोष्ट भाजप करते.त्यामुळे मी भाजप पक्षात असल्याचा गर्व वाटतो,असे अनूप चौधरी (Anoop Chaudhary) यांनी सांगितले.

हे वाचलं का?

दलित समाजाच्या उत्थाणासाठी आणि विकासासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठे कार्य केले आहे. मात्र मागचं सरकार दलित समाजाला वोट बॅक समजायचे. जेव्हा जेव्हा निवडणूक यायची तेव्हा हे नेते दलित वस्तीत जायचे, हाथ जोडायचे, फोटो काढायचे त्यानंतर लगचेच हात धुवुन घ्यायचे,अशी टीका अनूप चौधरी यांनी केली. तसेच जर एखादा दलित वरच्या जातीच्या नागरीकांच्या वस्तीत गेला आणि तेथील खुर्चीवर बसला तर त्याला ओरडून उठवले जायचे, त्यानंतर खुर्चीला तोडून किंवा जाळून टाकली जायचे. पण 2014 नंतर भाजप सरकारमध्ये आल्यानंतर ही परिस्थिती बदलली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT