Rajya Sabha Election 2024 : काँग्रेसचा उमेदवार ठरला! 'या' नेत्याला दिलं तिकीट

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

काँग्रेसने राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली आहे.
Chandrakant handore : congress announced candidate name for rajya sabha election 2024
social share
google news

Chandrakant Handore Rajya Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील सहा जागांसाठी राज्यसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवार जाहीर केला असून, चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण, यावेळी तरी हंडोरे जिंकणार का? अशी चर्चा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर होत आहे. (Chandrakant handore is congress candidate for rajya sabha election 2024 from maharashtra)

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. भाजपकडे तीन उमेदवार निवडून पाठवता येईल, इतके संख्याबळ आहे. तर शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडे प्रत्येकी एक उमेदवार निवडून पाठवता येईल इतकीच आमदारांची संख्या आहे. 

चंद्रकांत हंडोरेंना पुन्हा संधी

राज्यसभेची एक जागा असताना काँग्रेसमध्ये अनेकजण इच्छुक होते. त्यामुळे कुणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता होती. पण, काँग्रेसने चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली आहे. 2022 मध्येही काँग्रेसकडून हंडोरेंना उमेदवारी देण्यात आली होती, पण त्यांचा पराभव झाला होता. 

हे वाचलं का?

2022 मध्ये विधान परिषद निवडणूक झाली होती. या निवडणुकीत काँग्रेसने भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली होती. पण, काँग्रेसची मते फुटली. त्यामुळे चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता. तर भाजपने चार उमेदवार निवडून आणण्याची क्षमता असताना पाच जणांना निवडून आणले होते. 

Chandrakant handore contesting Rajya sabha from congress
राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने चार उमेदवारांची घोषणा केली असून, महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरेंना संधी देण्यात आली आहे.

या निवडणुकीत काँग्रेसची सात मते फुटली होती. या प्रकरणाची चौकशीही करण्यात आली होती. पण, त्यावर अद्यापही काँग्रेसकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. यावेळच्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसची मते फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हंडोरे खासदार होणार की पराभूत यांची उत्सुकता आहे. 

ADVERTISEMENT

सोनिया गांधी लढवणार नाही लोकसभा

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. सोनिया गांधी आता राज्यसभेत जाणार आहेत. राजस्थानमधून त्या निवडणूक लढवणार आहेत. त्याचबरोबर बिहारमधून काँग्रेसने अखिलेश प्रसाद सिंह यांना उमेदवारी दिली आहे. तर हिमाचल प्रदेशमधून अभिषेक मनू सिंघवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT