‘मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध शरद पवारांचा’, देवेंद्र फडणवीसांची टीका

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

devendra fadnavis criticize sharad pawar and supriya sule on maratha reservation lok sabha election maharashtra politics
devendra fadnavis criticize sharad pawar and supriya sule on maratha reservation lok sabha election maharashtra politics
social share
google news

Devendra Fadnavis Criticize Sharad Pawar And Supriya Sule : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सध्या महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच पेटले आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा हिवाळी अधिवेशनातही गाजला. त्यात आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांनी मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध शरद पवारांनी केला होता. त्यांच्या मनात असतं तर त्यांना मराठा समाजाला आरक्षण देता आले असते. पण त्यांना कधीच द्यायचं नव्हतं, त्यांना समाज -समाजाला झुंजवत ठेवायचं होतं,असा गंभीर आरोप देवेंद्र फडवणवीसांनी शरद पवारांवर केला आहे. (devendra fadnavis criticize sharad pawar and supriya sule on maratha reservation lok sabha election maharashtra politics)

ADVERTISEMENT

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या पदाधिकाऱ्यांची महत्वपुर्ण बैठक नागपूरातील कोराडी येथे पार पडली. या बैठकीत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना देंवेंद्र फडणवीस बोलत होते. मराठा आरक्षणाचा इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध शरद पवारांनीच केला आहे. तसेच महाविकास आघाडीची सत्ता असताना सुप्रिया सुळेंच वक्तव्य तुम्ही ऐकलं असेल तर, मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाहीत का? त्याच्याही पेक्षा मोठे प्रश्न महाराष्ट्रासमोर आहेत, असे सुप्रिया सुळेंचं त्यावेळचं व्यक्तव्य असल्याचे फडणवीसांनी सांगत त्यांच्यावर टीका केली.

हे ही वाचा : Pune : आठ मुली झाल्या, वंशाला दिवा नाही; दुसऱ्या लग्नाचा विचार करताच घडली भयानक घटना

त्यांच्या (पवारांच्या) मनात असतं तर मंडल आयोग लागू झाला, त्यावेळेसच देता आले असते. त्यांच्या मनात असतं तर वेगवेगळ निवाडे सर्वोच्च न्यायालयाचे आले, त्यावेळी कोण कुठल्या यादीत आहेत, कुणी विचारतही नव्हते, तेव्हा देता आले असते. पण त्यांना कधीच द्यायचच नव्हत, त्यांना समाज-समाजाला झुंजवत ठेवायचं होतं , त्यांचे राजकारण कसे आहे, लोक झुंजत राहिली तर आपले नेतेपद कायम राहिल, ही त्यांची मानसिकता आहे, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर केला आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : Crime: मुरबाडमध्ये माजी सभापतीने तरुणाचे दोन्ही हातच छाटले, पंजाही कापून फेकला!

लोकसभेच्या किती जागा लढणार?

देशाचा विकास फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच करु शकतात अशी जनतेला खात्री असल्याचे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. देशाची सुत्र पुन्हा एकदा मोदीजींच्या हातात द्यायची आहे. त्यामुळं पुढचे 9 ते 10 महिने पूर्ण वेळ आपण पक्षासाठी देणं गरजेचं असल्याचे फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रात लोकसभेच्या आपण किती जागा लढवणार याची चर्चा सुरु आहे. पण तुम्ही काळजी करु नका तुमच्या मनात जेवढ्या जागा तेवढ्या जागा आपल्या मिळणार असल्याचे फडणवीस म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT