‘आता इंडिया आघाडीची बैठक होईल अन्…’, देंवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

devendra fadnavis reaction on four state assembly election rajasthan madhypradesh chhatisagadh and telangana india alliance rahul gandhi
devendra fadnavis reaction on four state assembly election rajasthan madhypradesh chhatisagadh and telangana india alliance rahul gandhi
social share
google news

Devendra Fadnavis reaction on four state Election : मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणा या चार राज्यांच्या निवडणूकीचा निकाल हाती आला आहे. या निकालात मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या राज्यात भाजपचे सरकार येणार आहे, तर तेलंगणा राज्यात काँग्रेस सत्ता स्थापन करणार आहे. या निकालावर आता उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या (Narendra Modi) विकास आणि विश्वासावर भाजपने या निवडणूका जिंकल्या आहेत. आता लोकसभेतही असाच निकाल पाहायला मिळेल असे भाकित देखील देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. (devendra fadnavis reaction on four state assembly election rajasthan madhya pradesh Chhattisgarh and telangana india alliance rahul gandhi)

ADVERTISEMENT

चार राज्यातील विधानसभाच्या निवडणूकीच्या निकालावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तीन राज्यात भाजपला अभूतपूर्व यश मिळाले आहे. हे जनतेचा पंतप्रधान मोदींवरील विश्वास त्याचेच हे यश आहे. तसेच मोदींनी पारदर्शीपणे विकासाचा अजेंडा चालवला.या विजयाचे श्रेय नरेंद्र मोदी, जेपी नड्डा आणि अमित शहा यांना जात असल्याचे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले आहे.

हे ही वाचा : MP Election Results: ‘मलाही आशा-आकांक्षा आहेत, पण…’, ज्योतिरादित्य शिंदे असं म्हणाले अन्..

चार राज्यांचा निकाल हा जनतेच्या मनात नेमकं काय आहे? याचीच नांदी आहे. त्यामुळे आता लोकसभेमध्ये अभूतपुर्व विजय भाजपला आणि एनडीएला मिळणार असल्याची ही नांदी असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. तसेच जी इंडिया आघाडी तयार झाली होती, त्या इंडिया आघाडीला आणि राहुल गांधी यांच्या अंजेड्याला जनतेने नाकारले आहे.

हे वाचलं का?

आता निवडणूकीच्या या निकालानंतर इंडिआ आघाडीची बैठक होईल आणि बैठकीत पराभवाचे कारण ईव्हीएमवर फोडले जाईल. मात्र तरीही जनता मोदीजींच्या पाठिशी असल्याचा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला. हिच परिस्थिती महाराष्ट्रात देखील आहे. महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीतही दोन तृतीयांश ग्रामपंचायती महायुतीने जिंकल्या आहेत आणि लोकसभेत तेच पाहायला मिळणार आहे.जो विकास आणि विश्वास मोदीजींनी तयार केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात आणि देशात भाजप येणार असल्याचे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले आहे.

हे ही वाचा : अर्ध्या रात्री रिक्षाचालकाने मुलीच्या स्कर्टमध्येच घातला हात, अन्…

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT