गोव्यात ‘सनबर्न फेस्टिव्हल’वरून राजकीय गदारोळ; मुख्यमंत्र्यांवर विरोधकांचा निशाणा!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Goa Sun burn Festival Congress and aap party slams on CM Pramod Sawand and government
Goa Sun burn Festival Congress and aap party slams on CM Pramod Sawand and government
social share
google news

दिपेश त्रिपाठी

ADVERTISEMENT

Goa Sun Burn Festival : लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Election) गोव्यात काँग्रेस (Congress) आणि आप या विरोधी पक्षांनी एकजूट दाखवून मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Goa CM Pramod Sawant) आणि सरकारवर निशाणा साधला आहे. गोवा आपचे (Goa AAP) प्रमुख अमित पालेकर यांनी गोवा सरकारवर आरोप करत म्हटलं आहे की, ‘सनबर्न आयोजक सांगत होते की, गोव्यातील हा त्यांचा या वर्षीचा शेवटचा कार्यक्रम होता. (Goa Sun burn Festival Congress and aap party slams on CM Pramod Sawand and government)

पण प्रत्यक्षात गोवा सरकारने सनबर्नला नेहमीच चुकीच्या पद्धतीने पाठिंबा दिला आहे. त्याबदल्यात गोव्याचे फक्त नुकसान झाले आहे. गोव्यात चांगले पर्यटक आणण्याऐवजी सनबर्नमधून येणाऱ्या पर्यटकांनी गोव्याची बदनामी केली आहे.’

हे वाचलं का?

वाचा : मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी, ठाण्यातून आरोपीला ठोकल्या बेड्या

विरोधकांचा गोवा सरकारवर जोरदार हल्लाबोल

गोवा आम आदमी पक्षाचे प्रमुख अमित पालेकर म्हणाले, ‘गोवा सरकार सनबर्न फेस्टिव्हलला राज्य महोत्सव म्हणून प्रोत्साहन देत आहे. फेस्टिव्हलमध्ये पर्यटक हातात दारूच्या बाटल्या घेऊन नाचत असताना भगवान शंकराचे व्हिडीओ आणि गाणी वाजवली जातात. यामुळे हिंदूंच्या भावना स्पष्टपणे दुखावल्या गेल्या आहेत. तेव्हा आम्ही तातडीने कारवाईची विनंती केली होती, मात्र हिंदूंचे हितचिंतक म्हणवणाऱ्या राज्य सरकारने या प्रकरणात काहीही केले नाही. खरोखरच हे दुर्दैवी आहे.’

भाजपच्या हिंदुत्ववादावर प्रश्नचिन्ह?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गिरीश चोडणकर यांनीही सनबर्न फेस्टिव्हलचा उल्लेख करताना गोव्यातील भाजपच्या हिंदुत्ववादावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

ADVERTISEMENT

वाचा : अखेर आमदार सुनील कांबळेंवर गुन्हा दाखल, कानशिलात लगावलेलं प्रकरण भोवणार

चोडणकर म्हणाले, ‘मुख्यमंत्री प्रमोद सावंत सनातन धर्माबद्दल खूप बोलतात, मात्र भगवान शंकराची प्रतिमा वापरण्यात आली. लोक दारूच्या नशेत नाचत असताना ही प्रतिमा एलईडी स्क्रीनवर दाखवण्यात आली. अशा आयोजकांवर कारवाई करण्यात गोवा सरकार अपयशी ठरले. सनबर्न फेस्टिव्हल हे त्यांच्या नेत्याचे आणि पक्षाचे एटीएम असल्यानेच सावंत गप्प राहिले, हे स्पष्ट झाले आहे.’

ADVERTISEMENT

चोडणकर पुढे म्हणाले, ‘भाजपसाठी हिंदुत्व हे केवळ मते मिळविण्याचे आणि सत्ता ताब्यात घेण्याचे माध्यम आहे, अन्यथा प्रमोद सावंत सरकारने त्या आठ पक्षांतर करणाऱ्यांचा पक्षात समावेश केला नसता, ज्यांनी देवी महालक्ष्मीसमोर शपथ घेतली होती की ते पक्षांतर करणार नाहीत. यावरून हे सिद्ध होतं की, सत्तेत राहण्यासाठी भाजपला त्या लोकांसोबत हातमिळवणी करण्यात कसली हरकत नाही जे देवाचाही विश्वासघात करतात.’

वाचा : प्रभू श्रीरामा, आमच्या ‘महानंद’ला वाचव रे बाबा!’, ‘सामना’तून कर्मचाऱ्यांसाठी साकडे

हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की याआधी एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गोवा सरकार आणि सनबर्न फेस्टिव्हलवर भगवान शंकराची बदनामी केल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी काँग्रेस नेते विजय भेके यांनी म्हापसा पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र तक्रार करूनही कोणतीही कारवाई न केल्याने गोवा सरकारला विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT