गुजरातचे मुख्यमंत्री पटेल यांच्या मुलाला ब्रेन स्ट्रोक; उपचारासाठी मुंबईत दाखल
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा मुलगा अनुज पटेल यांना ब्रेन स्ट्रोकमुळे मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
मुंबई : गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) यांचा मुलगा अनुज पटेल (37) यांना मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अनुज यांना ब्रेन स्ट्रोक आल्यामुळे अहमदाबादच्या केडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र आता पुढील उपचारासाठी आज (सोमवारी) एअर अॅम्ब्युलन्सने त्यांना मुंबईला आणण्यात आले आहे. (Gujarat Chief Minister Bhupendra Patel’s son Anuj Patel has been admitted to Hinduja Hospital in Mumbai due to brain stroke.)
ADVERTISEMENT
हिंदुजा हॉस्पिटलचे डॉ. मिश्रा यांनी अहमदाबादमध्ये अनुज पटेल यांचे मेडिकल चेकअप केले होते. यावेळी पुढील उपचारासाठी मुंबईला दाखल करण्याचा सल्ला डॉ. मिश्रा यांनी दिला होता. त्यानंतर आता आज पटेल यांना एअर अॅम्ब्युलन्सने त्यांना मुंबईला आणण्यात आले आहे.
हे ही वाचा : ‘मन की बात’साठी लग्न ठेवले होल्डवर; नवरदेवाच्या मागणीने उपस्थित बुचकळ्यात
अहमदाबादच्या केडी हॉस्पिटलने बुलेटिन जारी करुन म्हटले आहे की, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा मुलगा अनुज पटेल यांना रविवारी (30 एप्रिल) दुपारी 2:45 वाजता केडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. ब्रेन स्ट्रोकचा त्रास झाल्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रुग्णालयात जाऊन अनुजच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.
हे वाचलं का?
मुख्यमंत्री पटेल यांचे कार्यक्रम रद्द :
मुलगा अनुज पटेलच्या प्रकृतीमुळे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल जामनगर दौर रद्द केला आहे. त्यामुळे गुजरात गौरव दिवस सोहळ्याच्या विविध कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होऊ शकणार नाहीत. राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्यासह राज्याचे आरोग्य मंत्री ऋषिकेश पटेल या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.
हे ही वाचा : VIDEO : स्कूल बस चालवताना ड्रायव्हरला हार्टअटॅक,सातवीच्या विद्यार्थ्यांने…
कोण आहे अनुज पटेल?
मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांना अनुज पटेल हा एकुलता एक मुलगा आहे. अनुज पटेल हे पेशाने इंजिनिअर आहेत. त्यांचा अहमदाबादमध्ये अंश कंस्ट्रक्शन व्यवसाय आहे. यात अनुज यांचा मेव्हणाही पार्टनर असल्याची माहिती आहे. अनुज पटेल यांच्या पत्नीचे नाव देवांशी पटेल असे आहे. मुख्यमंत्री आणि आमदार होण्यापूर्वी भुपेंद्र पटेल हेही याच कंस्ट्रक्शन व्यवसायात होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT