Gunaratna Sadavarte : सदावर्तेंना मोठा झटका! एसटी बँकेतील सत्ताच धोक्यात?
एसटी बँकेच्या 19 पैकी 12 संचालकांनी गुणरत्न सदावर्तेंवरोधात बंड पुकारलं आहे. हे बंड करून संचालक मंडळ वेगळी चूल मांडण्याची तयारी करत आहे. हे सर्वच्या सर्व 12 संचालक ट्रॅव्हलरमधून एसटी बँकेत पोहोचले आहेत.
ADVERTISEMENT
Gunaratna Sadavarte ST Bank : एसटी महामंडळाच्या स्ट्रेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँकेवर एकहाती सत्ता मिळवलेल्या प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना मोठा धक्का बसला आहे. कारण या बँकेतील 19 पैकी 12 संचालकांनी बंड केल्याची चर्चा आहे. हे बंड करून संचालक नॉट रिचेबल झाले आहेत आणि आता वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता गुणरत्न सदावर्ते यांची एसटी बँकेतील (St Bank) सत्ता जाणार असून त्यांना हा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. (gunaratna sadavarte 12 director of maharashtra state transport corporation bank resigned)
ADVERTISEMENT
दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या संपादरम्यान कर्मचाऱ्यांच्या बाजूने गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टात लढा दिला होता. त्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी महामंडळाच्या निवडणूकीत आपलं पॅनलही उतरवलं होतं. त्यानुसार सदावर्ते यांच्या पॅनेलने संचालक मंडळाची निवडणूक लढली होती. या निवडणूकीत सदावर्ते यांच्या पॅनलने 19 पैकी 12 जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे एसटी बँकेत गुणरत्न सदावर्तेंची एकहाती सत्ता आली होती.
हे ही वाचा : Hingoli Crime : ‘तू आम्हालाच नवरा समज’ म्हणत दीर आणि सासऱ्याचा सुनेवर…
दरम्यान आता एसटी बँकेच्या 19 पैकी 12 संचालकांनी गुणरत्न सदावर्तेंवरोधात बंड पुकारलं आहे. हे बंड करून संचालक मंडळ वेगळी चूल मांडण्याची तयारी करत आहे. हे सर्वच्या सर्व 12 संचालक ट्रॅव्हलरमधून एसटी बँकेत पोहोचले आहेत. या संचालकांनी एसटी महामंडळाचे अतिरिक्त संचालक बिमनवार यांची भेट घेतली आहे. या भेटीत त्यांनी वेगळा गट स्थापन केल्याची सुत्रांची माहिती आहे. त्यामुळे आता एसटी बँकेतील सदावर्ते यांची सत्ता जाणार असल्याचे बोलले जात आहे.
हे वाचलं का?
एसटी बँकेची सत्ता मिळाल्याने सदावर्ते यांनी संचालकांना हाताशी धरून मनमानी केल्याचे बोलले जात आहे. त्याचसोबत एसटी बँकेत 450 कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांनी वेगळा गट तयार केल्याचे सांगितले जात आहे.
हे ही वाचा : Ram Mandir : ठाकरेंचा PM मोदींवर हल्लाबोल, ‘राम अंहकारी नव्हता, पण मंदिराचे उद्घाटन करणारे…’
गुणरत्न सदावर्ते एसटी कामगारांच्या नशीबाला लागलेला कलंक आहे. एसटी बँकेचा कोणीही संचालक राजीनामा देणार नाहीत. बंडखोरी केलेल्या 13 ते 14 संचालकांना गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून फोडाफोडी करण्याचा प्रयत्न असफल झाल्याने सदावर्ते चुकीच्या बातम्या पेरत आहेत, असा घणाघात एसटी कामगार संघटनेचे नेते संतोष शिंदे यांनी केला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT