Lok Sabh 2024 : महाराष्ट्र काबीज करण्यासाठी भाजपची नवी रणनीती @ 48

मुंबई तक

ADVERTISEMENT

For 48 constituencies in Maharashtra, BJP has appointed Lok Sabha chiefs
For 48 constituencies in Maharashtra, BJP has appointed Lok Sabha chiefs
social share
google news

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकून केंद्रातील सत्ता कायम ठेवण्यावर भाजपनं लक्ष्य केंद्रीत केलं आहे. भाजपकडून राज्यनिहाय वेगवेगळी रणनीतींवर काम केलं जात आहे. केंद्रीय मंत्र्यांची लोकसभा प्रवास योजना सुरू केली आहे. तसेच लोकसभा मतदारसंघनिहाय नेते आणि पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आदेशही दिले गेले आहेत. एकीकडे केंद्रीय मंत्री आणि राज्यातील नेते लोकसभा मतदारसंघा पिंजून काढत आहेत. अशातच भाजपने महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघात पक्ष मजबूत करण्यासाठी काही नेत्यांवर जबाबदारी सोपवली आहे. लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून या नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

बारामती, ठाणे लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी कुणाकडे?

भाजपने देशातील 144 लोकसभा मतदारसंघात काम सुरू केले असून, त्यात महाराष्ट्रातील 16 मतदारसंघांचाही समावेश आहे. गेल्या काही महिन्यांपासून भाजपच्या नेत्यांचे बारामती, कोल्हापूर, ठाणे या भागातील दौरे वाढले आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी भाजपकडून जोरात काम सुरू असून, या मतदारसंघात लोकसभा प्रमुख म्हणून राहुल कुल यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राहुल कुल हे आमदार असून, गेल्यावेळी त्यांच्या पत्नी कांचन कुल यांनी निवडणूक लढवली होती.

दुसरेकडे भाजपचा वैचारिक चेहरा अशी ओळख असलेल्या आणि भाजपचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांना ठाणे लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. हातकंणगलेमध्ये सत्यजित देशमुख यांना लोकसभा प्रमुख केले आहे.

हे वाचलं का?

भाजपने नियुक्त केलेले लोकसभा निवडणूक प्रमुख – 2024

योगश सागर -मुंबई उत्तर
अमित साटम – मुंबई उत्तर पश्चिम
भालचंद्र शिरसाट -मुंबई उत्तर पूर्व
पराग अळवणी -मुंबई उत्तर मध्य
प्रसाद लाड -मुंबई दक्षिण मध्य
मंगलप्रभात लोढा -मुंबई दक्षिण
विनय सहस्त्रबुद्धे -ठाणे
मधुकर मोहपे -भिवंडी
शशिकांत कांबळे -कल्याण
नंदकुमार पाटील -पालघर
प्रशांत ठाकूर -मावळ
सतीश धारप -रायगड
प्रमोद जठार -रत्नागिरी/सिंधुदुर्ग
धनंजय महाडिक -कोल्हापूर
सत्यजित देशमुख -हातकंणगले
दिपक आबासाहेब -सांगली
अतुल भोसले -सातारा
विक्रम देशमुख -सोलापूर (एससी)
प्रशांत परिचारक -माढा
नितीन काळे -धाराशिव
दिलीप देशमुख -लातूर
राजेंद्र म्हस्के -बीड
व्यंकट गोजेगावकर -नांदेड
समीर राजूरकर -संभाजीनगर
विजय औताडे -जालना
रामप्रसाद बोर्डीकर -परभणी
रामराव वडकुते -हिंगोली
केदा नाना अहेर -नाशिक
बाळासाहेब सानप -दिंडोरी
राजेंद्र गोंदकर -शिर्डी
बाबासाहेब वाकडे -अहमदनगर
राधेशाम चौधरी -जळगाव
नंदू महाजन -रावेर
राजवर्ध कदमबांडे -धुळे
तुषार रंधे -नंदूरबार
जयंत डेहनकर -अमरावती
नितीन भुतडा -यवतमाळ-वाशिम
विजयराज शिंदे -बुलढाणा
अनुप संजय धोत्रे -अकोला
सुमित वानखेडे -वर्धा
प्रविण दटके -नागपूर
अरविंद गजभिये – रामटेक
किसन नागदेवे -गडचिरोली
प्रमोद कडू -चंद्रपूर
विजय शिवनकर -भंडारा-गोंदिया
मुरलीधर मोहोळ -पुणे
राहुल कुल -बारामती
महेश लांडगे -शिरूर

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT