Irshalwadi landslide : मायबाप गमावलेल्या मुलांचे एकनाथ शिंदे होणार पालक!
रायगड (Raigad) जिल्ह्यातील इर्शाळवाडी दुर्घटनेत अनाथ झालेल्या बालकांसाठी मुख्यमंत्री शिंदे (cm eknath shinde) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी या अनाथ बालकांचे पालकत्व स्वीकारले आहे. त्यामुळे आता या अनाथ मुलांची काळजी श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून घेतली जाणार आहे.
ADVERTISEMENT
रायगड (Raigad) जिल्ह्यातील इर्शाळवाडीत काही दिवसांपुर्वीच (Irshalwadi) दरड कोसळून मोठी जीवितहानी झाली होती. या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणावर नागरीक जमीनदोस्त झाले होते. या नागरीकांचा गेल्या चार दिवसांपासून बचाव पथकाच्या माध्यमातून शोध सुरु होता.अखेर हे बचावकार्य आज कायमस्वरूपी थांबण्यात आले होते. या दुर्घटनेत आता 27 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत अनेक मुलांनी आपल्या आई-वड़िलांना गमावले आहे. अशा बालकांसाठी मुख्यमंत्री शिंदे (cm eknath shinde) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी या अनाथ बालकांचे पालकत्व स्वीकारले आहे. त्यामुळे आता या अनाथ मुलांची काळजी श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. (irshalwali landslide cm eknath shinde adopt children who lost both parents raigad khalapur)
ADVERTISEMENT
इर्शाळवाडीत दुर्घटनेत अनेक लहान मुलांनी आपल्या आई-वडिलांना गमावले आहे. या अनाथ मुलांना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दत्तक घेणार आहेत श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) फाउंडेशनच्या माध्यमातून या मुलांची काळजी घेतली जाणार आहे. 2 ते 14 वयोगटातील मुलांच्या शिक्षण आणि इतर खर्च श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून केला जाणार आहे. तसेच प्रत्येक मुलासाठी त्यांच्या शिक्षणासाठी एक एफडी (फिक्स्ड डिपॉझिट) केली जाईल,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा : Irshalwadi Landslide : अश्रु आटले, डोळे थिजले… शेवटचं बघायची इच्छा राहिली अपूर्णच
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी घटनास्थळी भेट देऊन मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेतला. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली होती.
हे वाचलं का?
अहवालात काय?
खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीत 19 जुलैला रात्री दरड कोसळल्याची घटना घडली. या घटनेने गावातील अनेक घरे दरडीखाली गाडली गेली होती. या घटनेची माहिती बचाव मोहिम राबवण्यात आली होती. बचाव पथकांनी राबवलेल्या मोहिमेत गावातील 124 जण सुखरूप असून 78 नागरीक अद्याप बेपत्ता आहेत, तर 27 जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. या मृतांची नावे देखील समोर आली आहेत. तसेच यामध्ये 22 जण जखमी झाले होते, यामधील 18 जणांवर उपचार घेऊन त्यांना सोडण्यात आले आहे. तर 4 अजूनही उपचार घेत आहेत.
हे ही वाचा :अजित पवारांकडून NCP आमदारांना झुकते माप?; फडणवीस म्हणाले, ‘केवळ त्यांनाच…’
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT