Karnataka Exit Poll 2023: काँग्रेस भाजपला धूळ चारणार, पाहा Poll of Polls

मुंबई तक

ADVERTISEMENT

karnataka exit poll 2023 congress is the largest party in exit polls in karnataka know poll of polls
karnataka exit poll 2023 congress is the largest party in exit polls in karnataka know poll of polls
social share
google news

बंगळुरू: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी (Karnataka Election) बुधवारी झालेल्या मतदानानंतर आलेल्या बहुतांश मतदानोत्तर सर्वेक्षणांमध्ये (एक्झिट पोल) काँग्रेस (Congress) सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आतापर्यंत समोर आलेल्या प्रत्येक एक्झिट पोलमध्ये काँग्रेस जवळजवळ बहुमताच्या आसपास जात असल्याचं दिसतं आहे. त्यामुळे एक्झिट पोलनुसार भाजप (BJP) हातात असलेलं कर्नाटक राज्य गमावत असल्याचं पाहायला मिळत आहे. (karnataka exit poll 2023 congress is the largest party in exit polls in karnataka know poll of polls)

कर्नाटकमध्ये मतदान पार पडल्यानंतर वेगवेगळ्या चॅनल्स आणि सर्वे करणाऱ्या संस्थांचे एक्झिट पोल समोर आले. त्याचाच आपण पोल ऑफ पोल्स हा सविस्तरपणे जाणून घेऊया.

Poll of Polls:

  • इंडिया टुडे- एक्सिस माय इंडियाने केलेल्या सर्व्हेमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचं दिसत आहे. तर भाजप मात्र आपली सत्ता गमावत आहे. सर्व्हेनुसार काँग्रेसला 122 ते 140 जागा मिळू शकतात. तर भाजपला फक्त 62 ते 80 जागा मिळतील. तर जेडीएसला 20 ते 25 जागा मिळतील.
  • ‘झी न्यूज’ आणि ‘मॅट्रिक्स’ – यांच्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला 103 ते 118 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार भारतीय जनता पक्षाला 79 ते 94 तर जनता दल (सेक्युलर)ला 25 ते 33 जागा मिळू शकतात.
  • ‘टीव्ही 9’ आणि ‘पोलस्ट्रॅट’ – यांच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेसला 99 ते 109 जागा मिळू शकतात तर भाजपला 88 ते 98 जागा मिळण्याचा अंदाज आहे. याशिवाय जेडीएसला 21 ते 26 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
  • ‘एबीपी न्यूज’ आणि ‘सी व्होटर’ – यांच्या एक्झिट पोलने भाकीत केले आहे की काँग्रेसला 100 ते 112 जागा मिळू शकतात, भाजपला 83 ते 95 आणि जेडीएसला 21 ते 29 जागा मिळू शकतात.

    हे ही वाचा >> Gehlot Vs Pilot : “गेहलोतांच्या नेत्या सोनिया गांधी नव्हे, तर वसुंधरा राजे”

पोल ऑफ पोल्स

 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

  • रिपब्लिक पी-मारक्यू – यांच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेसला 94 ते 108 जागा मिळू शकतात, भाजपला 85 ते 100 आणि जेडीएसला 24 ते 32 जागा मिळू शकतात.
  • एशियानेट जन की बात – यांच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेसला 91 ते 106 जागा मिळू शकतात, भाजपला 94 ते 117 आणि जेडीएसला 14 ते 33 जागा मिळू शकतात.
  • न्यूज नेशन सीजीएम – यांच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेसला 86 जागा मिळू शकतात, भाजपला 94 ते 117 आणि जेडीएसला 14 ते 33 जागा मिळू शकतात.
  • टाइम्स नाऊ ईटीजी – यांच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेसला 106 ते 120 जागा मिळू शकतात, भाजपला 78 ते 92 आणि जेडीएसला 20 ते 26 जागा मिळू शकतात.

    हे ही वाचा >> “आ गए गद्दार”, शरद पवार शिंदेंवर बरसले, मोदींवरही चढवला हल्ला!

कर्नाटक विधानसभेच्या सर्व 224 जागांसाठी बुधवारी संध्याकाळी 6 वाजता मतदान संपले आणि सुमारे 65.69 टक्के मतदारांनी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावला. कर्नाटकमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप), काँग्रेस आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या जनता दल (S) यांच्यात तिरंगी लढत होत आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT