Constituency Wise BJP Candidates List: कोथरूडमधून भाजपने दिलं 'या' दिग्गज नेत्याला तिकीट, पाहा कोण आहे उमेदवार

मुंबई तक

ADVERTISEMENT

BJP constituency-wise candidate list
BJP constituency-wise candidate list
social share
google news

बातम्या हायलाइट

point

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केली पहिली यादी

point

भाजपने कोथरुड मतदारसंघात कोणाला दिली उमेदवारी?

point

भाजपने 99 जणांची यादी केली प्रसिद्ध

Maharashtra Assembly Election 2024 | Constituency Wise BJP Candidates List: पुणे: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) साठी भाजपने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी 99 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. कोथरूड मतदारसंघात भाजपने कुणाला तिकीट दिली? याबाबत जाणून घ्या

ADVERTISEMENT

कोथरूडमध्ये भाजपचा उमेदवार कोण? 

पुण्यातील कोथरूड हा भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. आतापर्यंत भाजपने इथे अनेकदा विजय मिळवला आहे. त्यामुळे भाजपने मागील निवडणुकीत हा सर्वात सुरक्षित मतदारसंघ म्हणून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली होती. 2019 विधानसभा निवडणुकीत कोथरूडच्या तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी यांचं तिकीट कापून चंद्रकांत पाटलांना भाजपने तिकीट दिलं होतं. त्यावेळी त्यांच्या उमेदवारीला काही प्रमाणात विरोधही झाला होता. मात्र, नंतरच्या काळात चंद्रकांत पाटलांनी या मतदारसंघात जम बसवला. त्यामुळे आता पुन्हा एकदा पक्षाने त्यांना उमेदवारी देऊ केली आहे. 

हे ही वाचा >>  BJP Candidate List : 89 विद्यमान आमदारांना संधी, कुणाकुणाला डच्चू? भाजपच्या यादीचं10 मुद्द्यांमध्ये विश्लेषण

2019 विधानसभा निवडणुकीत भाजपने किती जागा लढवलेल्या? 

2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 164 जागा लढवल्या होत्या. तर  शिवसेनेने 124 जागा लढवल्या होत्या. त्याआधी म्हणजे 2014 मध्ये भाजप आणि शिवसेनेची युती तुटली होती. त्यांनी या दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणुका लढवल्या होत्या. 

हे वाचलं का?

महाराष्ट्राची सत्ता राखण्याचं भाजप समोर आव्हान

लोकसभा निवडणूक 2024 मध्ये भाजपला महाराष्ट्रात सपाटून मार खावा लागला. 2014 आणि 2019 मध्ये महाराष्ट्रातील जनतेने भाजप युतीला भरभरून मतदान केलं होतं. त्यामुळे त्यांचे विक्रमी खासदार निवडून आले होते. मात्र, 2024 निवडणुकीत भाजप आणि महायुतीला महाराष्ट्रातील जनतेने सपशेल नाकारलं. 

हे ही वाचा >> BJP Marathwada Candidate : संतोष दानवे, बबनराव लोणीकर ते राणाजगजितसिंह... मराठवाड्यात भाजपकडून कुणाकुणाला संधी?

लोकसभेतील कामगिरी ही भाजपसाठी एका अर्थाने धोक्याची घंटा आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत सत्ता पुन्हा मिळविण्यासाठी भाजपने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचीच परिणिती म्हणजे आजची ही पहिली यादी आहे. ज्यामध्ये दिग्गज नेत्यांची तिकिटं कापण्यात आली आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT