भाजपची चुकीची कृती अन् घटनेची पायमल्ली, ‘सर्वोच्च’ निकालानंतर जयंत पाटलांची टीका

मुंबई तक

ADVERTISEMENT

supreme court verdict jayant patil criticize shinde fadnavis government
supreme court verdict jayant patil criticize shinde fadnavis government
social share
google news

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानंतर महाराष्ट्रात शिंदे सरकार कायम राहणार आहे. या निकालात सुप्रीम कोर्टाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतलेले निर्णय़ अवैध ठरवत त्यांना फटकारले होते. या निकालावर आता राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. भाजपची महाराष्ट्रातील कृती कशी चुकीची आहे तसेच घटेनेची पायमल्ली कशाप्रकारे झालीय, हे राज्यातील जनतेला सुप्रीम कोर्टाने सांगितल्याची टीका जयंत पाटील यांनी केली. (maharashtra politics supreme court verdict jayant patil criticize shinde fadnavis government

ADVERTISEMENT

शिंदे सरकार वाचलं हा सत्तेच्या भोवती गोळा झालेल्यांसाठी क्षणिक आनंद राहू शकतो. कसे बसे शिंदे सरकार वाचले ही आनंदाची भावना त्यांची राहू शकते. पण हे सर्व अवैध, घटनाबाह्य आहे. यातून भाजपने महाराष्ट्रात केलेली कृती कशी चुकीची आहे. तसेच घटेनेची पायमल्ली कशाप्रकारे झाली हे राज्यातील जनतेला सुप्रीम कोर्टाने सांगितले,असे जयंत पाटील म्हणाले.तसेच राज्यातील सर्व राजकीय परिस्थिती पाहून उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर महाविकास आघाडीला पुन्हा सत्तेत बसण्याची संधी मिळाली असती असे कोर्टाने सांगितले. यातून सुप्रीम कोर्टाच्या मनात काय होते हे स्पष्ट झाले आहे.

भरत गोगावले यांचा व्हीप अमान्य केला असल्याने विधानसभेतील शिवसेनेच्या सदस्यांनी जी कृती केली ती अवैध ठरणार आहे. त्यामुळे विधानसभेच्या अध्यक्षांना निर्णय घेताना सुप्रीम कोर्टाने ज्या मुद्यांची नोंद केली त्या चौकटीत राहून काम करावे लागेल असे ते म्हणाले. यामध्ये विधानसभा अध्यक्ष वेळकाढूपणाचे धोरण करू शकणार नाही, असे जयंत पाटील म्हणाले आहेत.

हे वाचलं का?

राज्यपालांना जसा माणूस भेटेला तसे ते मार्गदर्शन करत गेले. राज्यपालांना योग्य संधी मिळाली तेव्हा कायद्याची पायमल्ली करून आमचं सरकार घालवण्यासाठी राज्यपाल महोदयांनी फार मोठा हातभार लावला असा थेट आरोप जयंत पाटील यांनी भगतसिंह यांच्यावर केला आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडून नैतिकतेची अपेक्षा करणे जास्त अन्यायकारक होईल असे वाटते. ज्यावेळी त्यांनी सरकार स्थापन केले त्यावेळी कोणतीही नैतिकता नव्हती. त्यामुळे पुन्हा त्यांच्यावर नैतिकतेबद्दल बोलणे योग्य वाटत नाही. हे सरकार टिकवणे आणि मुख्यमंत्री म्हणून राहणे यालाच त्यांची प्राथमिकता असेल तर ते राजीनामा देणार नाहीत मात्र त्यांनी काय करावे हा सल्ला देण्याचा विरोधी पक्षाला अधिकार नाही असे जयंत पाटील म्हणाले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT