‘मराठा समाजाचे 8 मुख्यमंत्री झाले पण एकानेही…’, भाजप आमदाराचं मोठं विधान
राज्याला 8 वेळा मराठा समाजातील मुख्यमंत्री लाभले, मात्र एकानेही मराठा आरक्षण दिले नाही मात्र देवेंद्र फडणवीस मात्र मुख्यमंत्री होताच त्यांनी मराठा आरक्षण दिले असल्याचे वक्तव्य आमदार जयकुमार गोरे यांनी केले. यावेळी त्यांनी जाणत्या राजानेही कधी दिले नाही म्हणत त्यांनी शरद पवारांवर टीका केली.
ADVERTISEMENT
Maratha Reservation : मराठा आरक्षणावरून राज्याचे राजकारण तापलेलेल असतानाच आमदार जयकुमार गोरे (MLA Jaykumar Gore) यांनी मोठं विधान केले आहे. महाराष्ट्रात मराठा समाजाचे 8 मुख्यमंत्री (Chief Minister) झाले पण एकानेही मराठा समाजाला आरक्षण दिले नाही, मात्र देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनीच फक्त मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिल्याचे आमदार जयकुमार गोरे यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
जाणत्या राजाने न्याय दिला नाही
मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असतानाच आमदार जयकुमार गोरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करत त्यांनी शरद पवारांवरही जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी ते म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्रातील जाणत्या राजाने कधीच न्याय दिला नाही मात्र देवेंद्र फडणवीस पश्चिम महाराष्ट्राला न्याय देतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
हे ही वाचा >> Ram Mandir: ‘वाल्मिकींचा राम खरा कसा म्हणायचा?’, भालचंद्र नेमाडेंचा रामायणावरच अविश्वास
फडणवीसच आरक्षण देतील
पश्चिम महाराष्ट्रातील जनतेसह राज्यातील अनेकांची भावनाही हीच आहे की, मराठा समाजाला आरक्षण देवेंद्र फडणवीसच देऊ शकतील. कारण मराठा आरक्षणाचा विषय आता जरी निघाला असला तरी हा गेल्या अनेक वर्षांपासूनच विषय आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 8 मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे झाले मात्र त्यांना ते जमले नाही. त्याच बरोबर बारामतीच्या जाणत्या राजाला कधी मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दलही त्यांनी एकही शब्द काढला नाही असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.
हे वाचलं का?
शिंदेंच्या निर्णयाकडे डोळे
आमदार जयकुमार गोरे यांनी हे ही सांगितले की, देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री झाले होते, त्यावेळी त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची थेट भूमिका घेतली असल्याचेही त्यांनी यावेळी बोलून दाखवले. यावेळी त्यांनी हेही सांगितले देवेंद्र फडणवीस यांच्यावर ज्या प्रमाणे जनतेचा विश्वास आहे त्याच प्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही लोकांचा विश्वास आहे.
हे ही वाचा >> Asim Sarode : नार्वेकरांच्या निकालाची चिरफाड करणारे अॅड. असीम सरोदे कोण?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT