‘मराठा समाजाला शांतच राहुद्या,डिवचाल तर…’, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

Maratha Reservation, Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे आता आरक्षणा शिवाय सरकारला सुट्टी नाही. मराठा समाज शांत आहे. त्याला शांतच राहू द्या आम्हाला डिवचाल तर हे अंदोलन तुम्हाला खुप जड जाईल, असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिला आहे. लातूर जिल्ह्यातील औसा येथे झालेल्या सभेत मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) बोलत होते. (maratha reservation manoj jarange patil ultimatum for government criticize chhagan bhujbal)

ADVERTISEMENT

“गोरगरीब मराठ्यांना आता आरक्षण पाहिजे, त्याशिवाय सरकारला सुट्टी नाही. तुम्ही कितीही टोळ्या निर्माण करा. या टोळ्या उद्ध्वस्त करण्याची ताकद मराठा समाजाच्या मनगटात आहे. मराठ्यांना लेचापेचा समजू नका. कुऱ्हाडीची भाषा, कोयत्याची भाषा आम्हाला शिकवू नका. आमच्याही घरात काहीतरी आहे. तुम्हाला माहितीये”,असे जरांगे पाटील म्हणाले आहेत.

हे ही वाचा : NIAने उधळला ISISचा कट! ड्रोन हल्ला, IED स्फोट अन्…

जर आरक्षण असताना देणार नसतील तर कोणत्याही टोकाला आंदोलन करू. आता आमच्या पुढे पर्याय नाही. आम्ही लढणार आणि जिंकणार. काहीही झाले तरी 24 डिसेंबरला आरक्षण मिळणार म्हणजे मिळणारच. इथे श्रीमंत आणि गरीब मराठ्यांचा फायदा होणार आहे. ओबीसींनी आणि मराठ्यांनी एकमेकांच्या अंगावर जायचे नाही, तर त्याचा त्यांना ( भुजबळांना ) फायदा होईल. ओबीसीत जायचे सर्व निकष मराठा समाजाने पूर्ण केले आहेत. या संधीचे सोने करा, असे जरांगे पाटील यांनी सांगितले.

हे वाचलं का?

24 तारखेला आरक्षण दिले नाही तर पुढे हा लढा जोरात लढायचा आहे. पोरानं आरक्षण दिले तरच पोरांचे शिक्षण पूर्ण होतील. या अस्तित्वाच्या लढाईत कुठल्याही नेत्यांचे फूट पडू देऊ नका. राज्यातील मराठा समाजात ताकतीने एकजूट झाला आहे. मराठा समाज सध्या ऊन वारा काही बघत नाही, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

हे ही वाचा : Vishnu Deo Sai : छत्तीसगडचा मुख्यमंत्री ठरला! माजी केंद्रीय मंत्र्याकडे राज्याची सूत्रे

भुजबळांना धमकीवजा इशारा

“आपण रागीट लोक आहोत. राग आणू नका. त्यांनी कितीही अपमान केला तरी पचवा. शांत रहा. संयम आणि शांतता दोन्ही सोबत राहू द्या. एकदा आरक्षण मिळालं, मग आपण मोकळे. त्याला (छगन भुजबळ) कुठं जायचं नाही. आपल्याला कुठं जायचं नाही. तो आणि आपण एकाच गल्लीत आहोत. तू (छगन भुजबळ) नुसता बाहेर निघ म्हणा… आरक्षण मिळू द्या फक्त”, असा गर्भित इशारा मनोज जरांगेंनी भुजबळांना दिला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT