अजितदादांचे आमदार म्हणाले, ‘साहेब आता तुम्हीच…’, शरद पवारांनी भलताच ‘गुगली’ टाकला!

मुंबई तक

ADVERTISEMENT

ncp ajit pawar mla went to meet sharad pawar y b center july 17 bjp maharashtra poltics
ncp ajit pawar mla went to meet sharad pawar y b center july 17 bjp maharashtra poltics
social share
google news

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) बंड झाल्यापासून दररोज नवनव्या राजकीय घडामोडी घडत आहे. तसंच राज्यातील राजकीय वातावरण देखील बदलत आहे. एकीकडे शरद पवार (Sharad Pawar) हे भाजपसोबत (BJP) न जाण्याच्या मुद्द्यावर ठाम आहेत तर दुसरीकडे अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांच्यासोबतचे नेते हे शरद पवारांना पक्ष एकसंध राखण्यासाठी भाजपसोबत येण्याचं आवाहन करत आहेत. या सगळ्या गोष्टी सुरू असतानाच काल अचानक अजित पवार हे आपल्या मंत्र्यांसह शरद पवारांच्या भेटीला गेले होते. तर आज पुन्हा एकदा आपल्या समर्थक आमदारांसह ते शरद पवारांच्या भेटीला गेले. यावेळी आमदारांनी शरद पवारांना या पेचप्रसंगातून मार्ग काढा असं सांगितलं. मात्र, त्यांच्या या बोलण्यानंतर शरद पवारांनी एक भलताच गुगली टाकत अजितदादांच्या आमदारांना कचाट्यात पकडलं. (ncp ajit pawar mla went to meet sharad pawar y b center july 17 bjp maharashtra poltics)

ADVERTISEMENT

अजित पवारांचे समर्थक आमदार भेटून गेल्यानंतर शरद पवार यांनी आपल्या समर्थक आमदार आणि नेत्यांची एक बैठक घेतली. याच बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. याच पत्रकार परिषदेत आमदारांनी काय मागणी केली आणि शरद पवार यांनी त्याला काय उत्तर दिलं हेच जयंत पाटलांनी सविस्तर सांगितलं.

पाहा जयंत पाटील पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले:

‘आमदार पवार साहेबांना म्हणाले, यातून मार्ग काढा…’

‘शेवटी राजकारणात कधीही संवाद बंद करायचा नसतो.. येऊन जर कोणी बोलत असेल तर तो संवाद हा थांबवणं आवश्यक आहे असं मला वाटत नाही. जर ते आलेच.. तर पवार साहेब त्यांच्याशी परतही बोलतील.’

हे वाचलं का?

हे ही वाचा >> समर्थक आमदारच अजित पवारांवर भडकले; भेटीआधी काय घडलं? Inside Story

‘राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही लोकांनी काही कृती केलीए. पण तीच लोकं पवार साहेबांना येऊन कालही भेटले, आजही भेटले आणि मार्ग काढा यातून काही तरी.. मार्ग काही तरी दाखवा यातून.. अशी पवार साहेबांना त्यांनी विनंती केली. याबद्दल इतर कोणी अस्वस्थ होण्याची काही आवश्यकता नाही. पवार साहेब देशातले अनुभवी नेते आहेत. त्यांच्याकडे जाऊन त्यांनी जाऊन त्यांनी विनंती केली की, निर्माण झालेल्या परिस्थितीतून मार्ग काढा. असं पुन्हा एकदा आग्रह काढा असं सांगितलं..’

‘मार्ग काढा.. असं म्हणाले.. पर्याय नाही.. मार्ग काढा आणि पर्याय यात फरक आहे.’ असं जयंत पटाली यावेळी म्हणाले.

ADVERTISEMENT

‘यापुढे मार्ग कोणता काढायचा? तुम्ही काही मार्ग असेल तर सुचवा..’

पुढे ते म्हणाले की, ‘आमदारांनी विनंती केली की, मार्ग काढा यातून.. पवार साहेबांनी सांगितलं की, मागच्या निवडणुका.. आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित लढलो आहोत. अडीच वर्षाचं आपण महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलेलं होतं. अनेक ठिकाणी आपण भूमिका वारंवार लोकांसमोर जाऊन स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे यापुढे मार्ग कोणता काढायचा? तुम्ही काही मार्ग असेल तर सुचवा.. अशीच त्यांनी भूमिका दाखवली.’ असंही जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं.

ADVERTISEMENT

शरद पवारांचा आमदारांना गुगली..

एकीकडे अजित पवार हे शरद पवार यांना भाजपसोबत येण्यासाठी मागील दोन दिवसांपासून गळ घालत आहेत. मात्र, सध्या तरी शरद पवार हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. असं असताना आज पुन्हा एकदा आमदारांनी जेव्हा शरद पवारांना या परिस्थितीतून मार्ग काढण्यास सांगितला तेव्हा. पवारांनी त्यांनाच मार्ग सुचवा.. असं म्हणत आपण भाजपसोबत जाणार नाही हे एक प्रकारे सांगून टाकलं.

हे ही वाचा >> काल मंत्री, आज आमदार… शरद पवारांनी नेमकं काय केलं?, पटेलांनी खरं ते सांगूनच टाकलं!

एकीकडे अजित पवार गट हा गेल्या दोन दिवसांपासून शरद पवारांचा अदमास घेण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, शरद पवार हे आपल्या कोणत्याही कृतीचा उघडपणे उच्चार करणं टाळत आहेत. किंबहुना त्यांनी दोनही दिवस स्वत: पत्रकार परिषद न घेता आपल्या इतर नेत्यांना पत्रकार परिषद घेण्यास सांगत आहे. या सगळ्या गोष्टींमुळे अजित पवारांच्या आमदारांना देखील शरद पवारांचा नेमका राजकीय अंदाज लावता येत नाही. त्यामुळे त्यांचीही चिंता वाढली आहे.

जर शरद पवार यांच्या विरोधात जाऊन निवडणूक लढवली तर आपला पराभव होईल अशी भीती बहुसंख्य आमदारांना वाटत आहे. त्यामुळे आता हेच आमदार शरद पवारांना गळ घालत आहेत. अशावेळी आता शरद नेमकी कोणती चाल खेळणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT