Narendra Modi : PM मोदी राहुल गांधीवर कडाडले, 'काँग्रेसमुळे स्वातंत्र्यानंतरही देश गुलामगिरी...'
ज्या काँग्रेस पक्षाच्या नेत्याची (राहुल गांधी) काही गँरंटी नाही आहे. पक्षाची नितीची काही गँरंटी नाही, ते मोदींच्या गँरंटीवर प्रश्न उपस्थित करतात, असा टोला पंतप्रधान मोदी यांनी राहुल गांधींना लगावला.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
इंग्रजांकडून कोणाला प्रेरणा मिळत होती
इंग्रजांनी बनवलेली दंडसंहिता पिनल कोड का बदलली नाहीत?
पंतप्रधान मोदींचा राहुल गांधीवर टोला
PM Narendra Modi Criticize Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. ज्या काँग्रेस पक्षाच्या नेत्याची (राहुल गांधी) काही गँरंटी नाही आहे. पक्षाची नितीची काही गँरंटी नाही, ते मोदींच्या गँरंटीवर प्रश्न उपस्थित करतात, असा टोला पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी राहुल गांधींना (Rahul Gandhi) लगावला. इतकंच नाही तर पंतप्रधान मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू आणि मनमोहन सिंहवर टीका केली आहे. (pm narendra modi criticize rahul gandhi congress pandit jawaharlal nehru sonia gandhi on rajysabha speech)
ADVERTISEMENT
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, संसदेत इंग्रजांची आठवण काढण्यात आली. राजा महाराजांचे इंग्रजांसोबत चांगले संबंध होते. पण इंग्रजांकडून कोणाला प्रेरणा मिळत होती, असा सवाल पंतप्रधान मोदींनी यावेळी उपस्थित केला. तसेच काँग्रेस पार्टीला जन्म कुणी दिला होता. ही गोष्ट मी नाही विचारणार, असे मोदी म्हणाले.
तुम्ही इंग्रजांकडून प्रेरीत नव्हतात तर मग इंग्रजांनी बनवलेली दंडसंहिता पिनल कोड का बदलली नाहीत? शेकडो कायदे देशात का सुरु ठेवलेत ? लालबत्ती कल्चर कसा सुरु राहिला? भारताचे बजेट संध्याकाळी 5 वाजता मांडले जायचे, कारण ती ब्रिटीश संसद सुरु होण्याची वेळ होती. त्यामुळे बजेटची ती पंरपरा का सुरु ठेवलीत? राजपथला कर्तव्यपथ होण्यासाठी मोदींची वाट का पाहावी लागली? अंदमान-निकोबारात इंग्रजांच्या सत्तेची निशाण का लटकले होते? अशा प्रश्नांची सरबत्ती करत मोदींनी काँग्रेसमुळे आझादीनंतरही देशात गुलामगिरीची मानसिकता वाढल्याची टीका केली.
हे वाचलं का?
PM मोदींची नेहरूंवर टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी नेहरूंचे एक पत्र देखील वाचून दाखवले. हे पत्र पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशातील मुख्यमंत्र्यांना लिहले होते. 'मला कोणतेच आरक्षण आवडत नाही.नोकरीतही आरक्षण आवडत नाही. मी अशा निर्णयाच्या विरोधात आहेत. जे अकुशलतेच्या दिशेने नेईल आणि दुय्यम दर्जाची वागणूक देईल, असे नेहरूंनी चिठ्ठीत लिहले होते', असे पंतप्रधान मोदींनी सांगत, हे जन्मजात आरक्षणाचे विरोधी होते, असा घणाघात काँग्रेसवर केला. तसेच त्यावेळेस जर एससी, एसटी, ओबीसीला नोकरीत आरक्षण मिळालं तर सरकारच्या कामगाजाच स्तर पडेल असे त्यांचे विचार होते. त्यामुळे त्यांनी भरती देखील रोखली होती. त्यावेळेस जर भरती झाली असती तर प्रमोशन करून ते इथपर्यंत पोहोचले होते, असे मोदींनी सांगितले.
ADVERTISEMENT
दलित, मागासवर्गीय आणि आदिवासींच्या आरक्षणाला काँग्रेसने जन्मापासून विरोध केला होते. पण बाबासाहेबांनी दलितांना आरक्षण दिले. भाजपने एका महिला आदिवासीला देशाचे राष्ट्रपती केले होते. पण आदिवासी महिलेला राष्ट्रपती बनण्यासाठी काँग्रेसने विरोध दर्शवला. त्यामुळे काँग्रेसने राष्ट्रपतींचा अपमान केला आहे, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT