प्रफुल पटेल ट्विटमुळे फसले? सुप्रिया सुळे-जितेंद्र आव्हाडांनी पकडलं खिंडीत

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

शरद पवारांच्या वयावर टीका करणाऱ्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांना सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाडांनी पकडलं कात्रीत.
Supriya sule and jitendra awhad targets to praful patel over double standards over age
social share
google news

Praful Patel News Sharad Pawar : शरद पवारांचं वय झालंय, त्यांनी आता निवृत्त व्हावं, असं सतत अजित पवार म्हणत असतात. त्यांच्या समर्थक नेत्यांचीही तीच भूमिका आहे. पण, अजित पवार गटाचे राष्ट्रीय पातळीवरील नेते प्रफुल पटेलांनी एक ट्विट केले आणि पंचाईत झाली. पटेलांच्या याच ट्विटवर बोट ठेवत सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाडांनी त्यांना खिंडीत गाठलं. ते कसं तेच समजून घ्या. 

शरद पवारांच्या नेतृत्वाला आव्हान देत अजित पवारांच्या नेतृत्वाखाली काही आमदार, खासदार आणि नेत्यांनी वेगळी भूमिका घेतली. अजित पवार सतत शरद पवारांच्या वयाचा उल्लेख करतात आणि त्यांनी निवृत्त व्हावं,असेही सांगतात. अजित पवार गटाकडून सतत शरद पवारांना लक्ष्य केलं जातं असल्याचं दिसत आहे. 

प्रफुल पटेलांचं ट्विट

आता झालं असं की प्रफुल पटेलांनी एक ट्विट केलं. त्याच ट्विटवर बोट ठेवत सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाडांनी त्यांची कोंडी केली. त्यांनी काय कोंडी केली, हे बघण्यापूर्वी प्रफुल पटेल काय म्हणाले ते पहा...

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

ट्विटमध्ये प्रफुल पटेल म्हणतात, "आवड आणि दृढनिश्चयाचा विचार केल्यास वय ही फक्त एक संख्या राहते. हरियाणातील कदमा गावातील 107 वर्षीय ॲथलीट रामबाईंनी हे सिद्ध केले आहे की, स्वप्नांना एक्सपायरी डेट नसते."

ते पुढे ट्विटमध्ये म्हणाले की, "हैदराबाद येथील नॅशनल मास्टर्स ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमधील त्यांची दोन सुवर्ण पदकं त्यांच्या अविचल जिद्दीचा आणि समर्पणाचा पुरावा आहे. त्यांच्या कहानीने आपल्यात स्फुल्लिंग पेटवू द्या आणि स्वतःला आठवण करून द्या की आपल्या स्वप्नांचा पाठलाग करण्यास कधीही उशीर झालेला नसतो!"

ADVERTISEMENT

सुप्रिया सुळे-जितेंद्र आव्हाडांनी घेरलं

प्रफुल पटेलांच्या या ट्विटवर सुप्रिया सुळे मोजक्या शब्दात भूमिका मांडली. "मी पूर्णपणे तुमच्याशी सहमत आहे. वय हे फक्त एक आकडा आहे", असे म्हणत सुप्रिया सुळेंनी प्रफुल पटेलांची कोंडी केली.  

ADVERTISEMENT

दुसरीकडे जितेंद्र आव्हाडांनीही प्रफुल पटेलांना मार्मिक शब्दात सुनावले. ते म्हणाले, "प्रफुल पटेल यांनी चांगले कौतुक केले आणि वय हा फक्त आकडा आहे, हे हरियाणातील 107 वर्षीय ॲथलीट रामबाईचा संदर्भ देऊन अगदी बरोबर सांगितले."

"पण, तुम्हाला आठवण करून देण्यासाठी शरद पवार हे रामबाईपेक्षा 23 वर्षांनी लहान आहेत आणि तरीही त्यांनी निवृत्त होऊन घरी बसावे अशी तुमची इच्छा होती. तुम्ही केलेले ट्विट साहेबांच्या (शरद पवार) बाबतीत मात्र तुमच्या कृतीशी विरोधाभासी वाटते", असे म्हणत आव्हाडांनी प्रफुल पटेलांना चांगलंच सुनावलं. 

त्याचबरोबर आमदार रोहित पवार यांनीही पटेलांना चिमटा काढला आहे. "Age is Just a number… आदरणीय पवार साहेबांच्या बाबतीत आम्ही वारंवार हेच सांगतोय…  पण साहेबांच्या बाबतीत पटलं नाही, आता इतरांच्याबाबतीत आणि उशीरा आलेलं हे शहाणपण लोकांना कसं ‘पटेल’?", असा टोला रोहित पवारांनी लगावला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT