‘राम शिकार करून मांसाहार करत…’, आव्हाड म्हणाले, आम्ही रामाचा आदर्श पाळतो

मुंबई तक

ADVERTISEMENT

Ram was hunting and eating meat MLA Jitendra Awhad controversial statement
Ram was hunting and eating meat MLA Jitendra Awhad controversial statement
social share
google news

Ram Mandir : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार (Sharad Pawar) गटाचे शिर्डीमध्ये शिबिरामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड (MLA Jitendra Awhad) यांनी विरोधकांसह बंडखोरांवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या बंडखोरीनंतर त्यांना उपमुख्यमंत्री बनवणं ही राष्ट्रवादीची मोठी चूक असल्याचेही त्यांनी जाहिरपणे सांगितले. तर याचवेळी त्यांनी राम मंदिरावरून चाललेल्या राजकारणावर बोलत असताना त्यांनी, राम आपला आहे, तो बहुजनांचा असल्याचे सांगत राम (Ram) शिकार करून मांसाहार करत होता असं वादग्रस्त वक्तव्य केल्याने आता नवा राजकीय वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. जितेंद्र आव्हाड यांनी हे विधान केल्यानंतर राजकारण्यापासून सर्ववर्गातून त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे.

ADVERTISEMENT

राम मंदिर इव्हेंट

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीच्या शिबिरामध्ये बोलताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करताना त्यांनी अजित पवारांसह बंडखोरी करणाऱ्यांवरही त्यांनी टीका केली. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रीय  स्वयंसेवक संघावर टीका करताना त्यांनी महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावरुनही त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. यावेळी भाजपने राम मंदिराचा केलेल्या इव्हेंटवरूनही त्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.

हे ही वाचा >> ‘…तर एकनाथ शिंदे स्वस्थ बसणार नाही’, मलंगगडावरून मुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त विधान

शाकाहार कुठे शोधणार?

राम मंदिराच्या कार्यक्रमावर बोलतानाच त्यांनी प्रभू रामवरही बोलले. यावेळी ते म्हणाले की,  राम आपला आहे, तो बहुजनांचा आहे. राम शिकार करून मांसाहार करत होता. तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला निघाला आहात. मात्र आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि मांसाहारी अन्न खात आहोत. 14 वर्ष वनवासात राहणारा माणूस शाकाहारी अन्न कुठे शोधणार? असा सवाल त्यांनी शिबिरामध्ये केला. त्यावरूनच आता नवा वाद निर्माण झाला आहे.

हे वाचलं का?

घरासमोर आंदोलन

राम शिकार करुन मांसाहार करत होता त्यावरूनच आता त्यांच्यावर जोरदार टीका होऊ लागली आहे. त्यांच्या या विधानामुळे त्यांच्या घरासमोरही काही नागरिकांनी आंदोलन केल्याचे सांगण्यात येत आहे. जितेंद्र आव्हाड यांनी रामायणातील संदर्भ देत राम मांसाहार करत असल्याचे सांगत तो बहुजनांचा होता असंही त्यांनी यावेळी सांगितले.

हे ही वाचा >> ‘2019 मध्ये अजित पवारांना उपमुख्यमंत्री करणं ही सर्वात मोठी चूक होती’

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT