Sachin Pilot : सरकार कोसळल्यानंतर गेहलोत अडचणीत, OSDच्या दाव्याने राजस्थानात भूकंप

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

sachin pilot movement phone tracked ashok gehlot osd lokesh sharma rajasthan assembly election
sachin pilot movement phone tracked ashok gehlot osd lokesh sharma rajasthan assembly election
social share
google news

Sachin Pilot movement phone tracked Osd Lokesh Sharma : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यात काँग्रेसचा पराभव झाला. काँग्रेस या पराभवाची कारणे शोधत असताना तिकडे राजस्थानमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांचे ओएसडी लोकेश शर्मा (OSD Lokesh Sharma) यांनी राजस्थानमधील (Rajasthan) काँग्रेसच्या पराभवावर मोठा खुलासा केला आहे. राजस्थानचा निकाल बदलता आला असता, पण हा बदल अशोक गेहलोत यांनाच नको होता, असा खळबळजनक दावा लोकेश शर्मा यांनी केला आहे. इतकंच नाही तर अशोक गेहलोत सत्तेत असताना त्यांनी पक्षातीलच नेत्यांचे फोन टॅप केले होते, त्याच्यावर पाळत ठेवल्याचेही शर्मा यांनी सांगितले आहे. त्यामुळे कॉग्रेसमध्ये मोठी खळबळ माजली आहे. (sachin pilot movement phone tracked ashok gehlot osd lokesh sharma rajasthan assembly election)

समाचार एजेंन्सी दिलेल्या वृत्तानुसार, ओएसडी लोकेश शर्मा विधानसभा निवडणूकीत तिकिट मांगत होते. पण काँग्रेसने त्यांना तिकिट नाकारले होते. त्यामुळे आता राजस्थानमधील काँग्रेसच्या पराभवानंतर लोकेश शर्मा अशोक गेहलोतांवर टीका करत आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात आमदांराची एक बैठक होणार होती. पण ही बैठक गेहलोत यांच्या जवळच्या नेत्यांनी होऊनच दिली नाही. यामागचे कारण म्हणजे, काँग्रेस निरीक्षकांनी आणलेला अजेंडा अंमलातच आणायचा नव्हता. खरं तर त्यावेळेस काँग्रेसचे हायकमांड अशोक गेहलोत यांना पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष बनवणार होते आणि सचिन पायलट यांना राजस्थानचा मुख्यमंत्री, अशी धक्कादायक माहिती लोकेश शर्मा यांनी दिली.

हे ही वाचा : Dhule Crime : बहिण माहेरी आली अन् घात झाला, मामाच्या घरी भाच्याची हत्या कुणी केली?

अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील मतभेदांमुळे पक्षाला मोठं नुकसान झाले आहे. जेव्हा 2020 मध्ये राजस्थान सरकारवर राजकीय संकट आले होते. त्यावेळेस सचिन पायलट यांनी आपल्या 18 आमदारासह बंडखोरीचा निर्णय घेतला होता. अशा परिस्थितीत सरकारने आपल्या यंत्रणांना कामाला लावून आमदारांवर पाळत ठेवली होती. बंडखोर नेते कुठे जातात? कुणासोबत बोलतात? या सर्व गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवले जात होते. विशेष म्हणजे सचिन पायलट आणि 18 आमदार बंडखोरी करण्याच्या आधीपासून त्यांच्यावर पाळत ठेवली जात होती, असा धक्कादायक खुलासा लोकेश शर्मा यांनी केला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

लोकेश शर्मा यांनी यावेळी राजस्थानमधील काँग्रेसच्या पराभवाचे कारणही सांगितले. निवडणूक आणखीण चांगल्या प्रकारे लढवता आली असती. पण पराभवाचे मुख्य कारण म्हणजे तिकीटांचे वाटप योग्य पद्धतीने झाले नाही. विशेष म्हणजे, सरकारविरूद्ध कोणतीच सत्ताविरोधी लाट नव्हती. पण अनेक आमदारांना त्यांचे प्रतिनिधी म्हणून परत येताना लोकांना पाहायचेच नव्हते. हा अहवाल मुख्यमंत्र्यांना दिला होता. हा अहवाल माझा नव्हता तर, एआयसीसीचे (AICC) सर्वेक्षण आणि इतर अहवाल होते. त्यामुळे अहवालानुसार विद्यमान आमदारांची तिकिटे रद्द व्हायला हवी होती, पण तसे झाले नाही, असा दावा शर्मा यांनी केला आहे. आणि हेच पराभवाचे मुख्य कारण असल्याचे देखील लोकेश शर्मा यांनी सांगितले.

हे ही वाचा : BJP MPs : केंद्रीय मंत्र्यांसह भाजपच्या 10 खासदारांचे राजीनामे, पहा यादी

सचिन गेहलोत आपल्या भूमिकेवर ठाम होते आणि अहवाल देऊन सुद्धा त्यांनी कोणतीच पाऊले उचलली नाहीत. गेहलोत यांना वाटले की त्यांचे सरकार वाचविण्यासाठी ज्यांनी मदत केली,त्यांच्याप्रती त्यांचे नैतिक कर्तव्य आहे, असे देखाील लोकेश शर्मा यांनी सांगितले. तसेच तुम्हाला तिकीट मिळालं नाही, यासाठी तुम्ही गेहलोतांवर आरोप करताय का? असा सवाल लोकेश शर्मा यांना करण्यात आला होता. यावर त्यांनी या गोष्टीस नकार दिला. त्यासोबत तिकीटाचा निर्णय हा पक्षाने घ्यायचा असतो. मी एका कार्यकर्त्याप्रमाणे पक्षाकडून तिकीट मागितले होते्, असे लोकेश शर्मा म्हणाले आहेत. तसेच मी ही गोष्ट यासाठीच करतो आहे. कारण पक्षाने सुधारणात्मक पाऊले उचलावीत. लोकसभा निवडणूक आता जवळ आहे आणि गोष्टी बदलणे गरजेचे आहे, असे लोकेश शर्मा म्हणाले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT