मोदींचा मौनी बाबा का झाला? त्यांच्या जिभेला…; संजय राऊतांचं वर्मावर बोट
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना डिवचलं. संजय राऊतांनी या तिन्ही मुद्द्यांवर भूमिका मांडत थेट पंतप्रधान मोदींवरच टीकेचे बाण डागले आहेत.
ADVERTISEMENT
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना डिवचलं. राऊतांनी रोखठोक सदरातून पालघर साधू हत्या, खारघर येथे महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानंतर झालेले मृत्यू आणि माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्यासंदर्भात केलेल्या गौप्यस्फोटाबद्दल भाष्य केलं आहे. संजय राऊतांनी या तिन्ही मुद्द्यांवर भूमिका मांडत थेट पंतप्रधान मोदींवरच टीकेचे बाण डागले आहेत.
ADVERTISEMENT
संजय राऊत रोखठोकमध्ये म्हणतात, “नवी मुंबईतील खारघर येथे 14 साधकांचे बळी गेले. सरकारने उकळत्या उन्हात घेतलेले हे बळी. ‘पुलवामा’ हल्ल्यात 2019 साली 40 जवानांचे बळी सरकारी कृपेने गेले याचा स्फोट आता जम्मू-कश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केला. ‘पुलवामा’ बळी हेसुद्धा सदोष मनुष्यवध आणि पालघरच्या तीन साधूंची हत्या म्हणजेही सदोष मनुष्यवधच! मग वेगवेगळा न्याय का?”, असा सवाल राऊतांनी सरकारला केला आहे.
हेही वाचा >> राजकीय नसबंदी…,भाजपचे पाळलेले पोपट, संजय राऊतांची मनसेवर टीका
“माणसांच्या जिवाची सध्या कोणालाही किंमत नाही व पातळी घसरलेल्या राजकारणाने तर सध्या मरण सगळ्यात स्वस्त केले. ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार सोहळा भरदुपारी रणरणत्या उन्हात पार पडला. राजकारणी, श्रीमंतांच्या खाशा स्वाऱ्यांसाठी थंड मंडप आणि सावलीतले व्यासपीठ उभे केले व लाखोंचा जनसागर उन्हात. त्यात मुले, महिला, वृद्ध वगैरे 42 डिग्री तापमानात उघड्यावर होते. पुन्हा श्रीमंतांची भाषणे लांबत गेली आणि उष्माघाताने व चेंगराचेंगरीने 14 जिवांचे बळी गेले. हा आकडा खरा नाही”, असा दावा संजय राऊतांनी केला आहे.
हे वाचलं का?
हा मुख्यमंत्री शिंदेंचा स्वार्थ होता -संजय राऊत
संजय राऊतांनी पुढे म्हटलं आहे की, “गेल्या पंधरा दिवसांत सरकारपुरस्कृत सदोष मनुष्यवधाची दोन प्रकरणे समोर आली. ‘पुलवामा’ येथे 2019 साली घडलेल्या 40 जवानांचे हत्याकांड हे मोदी सरकारच्या निपियतेचे बळी होते. राजकीय फायद्यासाठी ‘पुलवामा’ हत्याकांडाचा वापर भारतीय जनता पक्षाने केला हे पहिले. खारघर येथे ‘महाराष्ट्रभूषण’ सोहळ्याच्या निमित्ताने लाखोंची गर्दी जमवून गृहमंत्री अमित शहांकडून पाठ थोपटून घ्यायची हा मुख्यमंत्री शिंदे यांचा राजकीय स्वार्थ होता, हे दुसरे. पुलवामा आणि खारघर या दोन्ही दुर्घटनांत निरपराध मारले गेले. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दोन्ही बाबतीत सरकारकडून घडला.”
हेही वाचा >> आप्पासाहेब धर्माधिकारींच्या श्री समर्थ बैठकीतील अधिष्ठान म्हणजे काय.. श्री सदस्यांना कसं मिळतं?
“आता भारतीय जनता पक्षाचा दुटप्पीपणा कसा तो पहा. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पालघरला जमावाकडून तीन साधूंचे हत्याकांड झाले. त्यामुळे ठाकरेंच्या राज्यात हिंदुत्वाची हत्या झाली अशी बोंब देशभरात मारून एक वातावरण निर्माण केले गेले. विरोधी पक्षनेते तेव्हा देवेंद्र फडणवीस होते व त्यांनी साधूंच्या हत्येबद्दल सरकारला जबाबदार धरून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी केली”, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
मृतांच्या कुटुंबीयांना पैसे वाटले, राऊतांचा गंभीर आरोप
“डहाणूच्या गडचिंचले गावात जेथे साधू मारले गेले तेथे फडणवीस यांच्यासह संपूर्ण भाजपची जत्राच उसळली होती, पण आता खारघरमध्ये जे 14 ‘श्री सेवक’ मारले गेले ते झुंडीचेच बळी होते. हे 14 जण हिंदुत्वाच्या कार्यासाठीच खारघरला आले होते व सरकारी बेफिकिरीचे बळी ठरले. मात्र या हत्याकांडावर श्री. फडणवीस आणि त्यांच्या भाजपची संपूर्ण ‘तीर्थयात्रा’ गप्प आहे. 14 हिंदू धार्मिक कार्पामात मारले गेले. हे सर्व प्रकरण पैसे वाटून मिटवण्यासाठी इस्पितळात व मृतांच्या घरी कोणाचे लोक पोहोचले? गृहमंत्री फडणवीस, कृपया चौकशी करा”, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
ADVERTISEMENT
sanjay Raut : “फेकू भाषणे ठोकणारे गप्प आहेत”
“आयबी म्हणजे केंद्रीय गुप्तचर खात्याने पुलवामा हल्ल्याच्या संदर्भात इत्थंभूत माहिती आधीच पोहोचवली. सरकारने त्याकडे डोळेझाक केली व जवान मारले गेले. त्यामुळे सत्यपाल मलिक यांनी आता केलेल्या स्फोटाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. देशाचे संरक्षणमंत्री, गृहमंत्री, पंतप्रधान व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यावर चूप आहेत. एरवी लांबलचक ‘फेकू’ भाषणे ठोकणारे भाजपवाले गप्प आहेत”, अशा शब्दात राऊतांनी भाजप नेत्यांवर टीकास्त्र डागलं आहे.
हेही वाचा >> आप्पासाहेब धर्माधिकारींच्या ‘श्री समर्थ बैठकी’त नेमकी काय मिळते शिकवण?
“पालघरच्या तीन साधू हत्याकांडावर जो ‘भाजप’ व त्यांचे मंत्री उसळून उठले ते खारघरच्या ‘साधक’ बळांवर गप्प आहेत. पुलवामा खुलाशावर तर त्यांची दातखिळीच बसली आहे. आपले पंतप्रधान मोदी नोटाबंदीच्या अपयशावर आणि रांगेतल्या शेकडो बळींवर बोलत नाहीत, मोदी अदानींच्या घोटाळय़ावर बोलत नाहीत व जे मोदी सर्जिकल स्ट्राइकच्या फटाकेबाजीवर जाहीर सभांतून बोलत राहिले, ते मोदी पुलवामाच्या निर्घृण हत्याकांडावर सत्यपाल मलिक यांनी जो स्फोट केला, त्यावरही बोलत नाहीत! मोदी यांचा मौनी बाबा नक्की का झाला? त्यांच्या जिभेला असा मौनाचा आजार का जडला? लोक मरोत, जगोत, सैनिक बॉम्बस्फोटांत मरोत, लोक चिरडून मरोत, आम्हाला काय त्याचे? सरकार त्याच भूमिकेत आहे!”, अशा शब्दात संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर हल्ला चढवला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT