‘खारघर दुर्घटना पैशाच्या जोरावर…’,संजय राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप

मुंबई तक

ADVERTISEMENT

sanjay rauts serious allegation against the government
sanjay rauts serious allegation against the government
social share
google news

Sanjay rauts serious allegation against the government : महाराष्ट्र भूषण कार्यक्रमा दरम्यान घडलेल्या खारघर दुर्घटनेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पुन्हा एकदा घेरले आहे. सरकारकडे मन आणि हदय असतं तर खारघरच्या श्रीसेवकांच्या हत्येचे प्रकरण पैशाच्या जोरावर दडपलं नसतं असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी सरकारवर केला आहे. त्यामुळे सरकारला पैशाची आणि सत्तेची मस्ती असल्याचीही टीका राऊत यांनी केली. (sanjay rauts serious allegation against the government kharghar accident due to money…)

ADVERTISEMENT

खारघरच्या श्रीसेवकांच्या हत्येचे प्रकरण त्यांनी पैशाच्या जोरावर दडपलं नसतं, ज्या पद्धतीने चौकशी व्हायला हवी आणि सदोष मनुष्यवधाबाबत सरकारने प्रायश्चित घ्यायला पाहिजे होते, ते सरकार घ्यायला तयार नाही. त्यामुळे सरकारला पैशाची आणि सत्तेची मस्ती असल्याची टीका राऊत यांनी केली.

हे ही वाचा : ‘शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसून मुंबई तोडण्याचा डाव’,ठाकरे गटाची भाजपवर टीका

संजय राऊतांकडून पंतप्रधानांवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचा रविवारी 100 वा एपिसोड पार पडला.या कार्यक्रमावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. क्या है मन कि बात, जन की बात सुनिये असा हिंदीत डायलॉ़ग मारून राऊत यांनी पंतप्रधान मोदींना लक्ष केले. आणि कोरोनात थाळ्या वाजवायचा आणि कालचा टाळ्या वाजवायचा कार्यक्रम होता, अशी खिल्ली देखील राऊत यांनी उडवली.देशात रोजगारनिर्मिती, गरीबी हटवण्याची गरज आहे. 40 जवान शहिद झालेल्या पुलवामा हल्ल्याच्या चौकशीची गरज आहे. पण पंतप्रधान मन की बात करतायत, त्यामुळे मोदींनी जन की बात ऐकावी असा सल्ला दिला.

हे वाचलं का?

पंतप्रधानांचे भाषण हे प्रेरणादायी असायला हवं, जनतेने ते ऐकले पाहिजे. कोरोनात थाळ्या वाजवायचा जसा कार्यक्रम होता तसा कालचा टाळ्या वाजवायचा होता, अशी खिल्ली राऊत यांनी यावेळी उडवलीय. तसेच ज्यांना ऐकायचे ते ऐकतील ना, असे देखील राऊत म्हणाले. सिनेमा कलाकारांना घेऊन जो इवेंट केला गेला त्याची देशाला गरज नव्हती, तर भाजपाला होती.तसेच देशाची मन की बात नव्हती,तर पक्षाच्या मन की बात होती, अशी टीका देखील राऊत यांनी केली.

हे ही वाचा : ‘उद्धवला आण, बघतो कसा येतो तो,’नारायण राणेंचे थेट आव्हान

‘त्या’ व्हिडिओवर काय म्हणाले?

संजय राऊत यांनी काल रात्री एक व्हिडिओ ट्विट केला होता. या ट्विटवर संजय राऊत म्हणाले की, मुंबईत ड्रग्ज विकल्या जाणाऱ्या एका बारमध्ये भाजपचा नेता रात्रीच्या तीन वाजता होता. या बारमध्ये भाजप नेत्याने पोलिसांसोबत हुज्जत घातली, शिविगाळ केली. हा व्हिडिओ देवेंद्र फडणवीस यांना पाठवून कारवाईची मागणी केलीय. सरकार आता भाजप नेत्यावर कारवाई करणार की पाठीशी घालणार आहे, असे राऊत म्हणाले आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT